पतीच्या अचानक मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने पत्नीची आत्महत्या

पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. पतीचा अचानक मृत्यू झाल्याने धक्का बसलेल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

virar death

पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. पतीचा अचानक मृत्यू झाल्याने धक्का बसलेल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बुधवारी सकाळीमनवेलपाडा येथे ही घटना उघडकीस आली.

विरार पुर्वेच्या मनवेलपाडा येथील दादूस क्लासिक या इमारतीत नरेंद्रसिग परमार (२८) हा पत्नी संतोषकुवर परमार (२२) हिच्यासह राहात होता. मंगळवारी नरेंद्रसिंग यांच्या पोटात दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. रात्री तो ११ वाजता घरी आला. मात्र पोटदुखीने त्याचा मृत्यू झाला. घरात एकटी असेलल्या त्याच्या पत्नी संतोषकुंवर उर्फ बबली हिला पतीच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही. त्यामुळे तिने पतीच्या शेजारीच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या गेली. बुधवारी सकाळी संतोषकुवरचा भाऊ रात्रपाळीवरून घरी आल्यानंतर दार बंद दिसले. दुसर्‍या चावीने दार उघडले असता हा प्रकार उघडकीस आला, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली. याप्रकरणी विरार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

नरेंद्रसिंग परमार हा मिरा रोड येथील किराणा मालाच्या दुकानात काम करत होता. अडीच वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Virar wife commits suicide after husband sudden death rmt

ताज्या बातम्या