पोलीस ठाण्यात स्थलांतराची मागणी

समीर कर्णुक

two Children Drown While Swimming, Surya River, palghar taluka, One Rescued, two dead Body Found , two Children Drown in Surya River, palghar news, Drown news,
सूर्या नदीत दोघांचा बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

मुंबई : पोलीस ठाण्याच्या मूळ इमारतीच्या दुरवस्थेमुळे वडाळा पोलीस ठाण्याचे कामकाज गेल्या तीन वर्षांपासून बीपीटीच्या एका इमारतीमध्ये सुरू आहे. भाडे तत्त्वावर घेतलेल्या इमारतीतील काही खोल्यांमध्ये पोलिसांना दाटीवाटीने काम करावे लागत आहे. त्यामुळे पोलिसांना मोठया प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत असल्याने, आम्हाला आमच्या हक्काच्या पोलीस ठाण्यात लवकरच स्थलांतर करावे अशी मागणी काही पोलिसांनी केली आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर १९६८ साली वडाळा पोलीस ठाणे सुरू करण्यात आले होते. त्यावेळी लहानशा जागेवर या पोलीस ठाण्याची इमारत बांधण्यात आली होती. मात्र काही वर्षांनंतर या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने, ही जागा पोलिसांना अपुरी पडू लागली होती. मात्र नाईलाजास्तव अनेक वर्षे पोलिसांनी अपुऱ्या जागेत, पोलीस ठाण्याचे कामकाज योग्यरीत्या पार पडले. मात्र अनेक वर्षे या पोलीस ठाण्याच्या इमारतीची डागडुजी झाली नाही.

 याबाबत पोलिसांकडून अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. इमारत कोसळून कधीही मोठी दुर्घटना होण्याची भीती होती. त्यामुळे  २०१९ ला पोलीस ठाण्याचे कामकाज बीपीटी कॉलनीतील इमारत क्रमांक ३२ मध्ये सुरू करण्यात आले. भाडे तत्त्वावर सध्या बीपीटीने पोलिसांनी या ठिकाणी १६ खोल्या दिल्या आहेत.  मात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या तुलनेत या खोल्या अपुऱ्या पडत असल्याने पोलिसांना काम करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे जुन्याच पोलीस ठाण्याच्या जागेवर नवीन इमारत बांधून तेथे स्थलांतर करावे अशी मागणी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

पावसाळय़ात समस्या

अनेक वर्षे या पोलीस ठाण्याच्या इमारतीची डागडुजी झाली नाही. त्यामुळे पावसाळय़ात छतातून पाणी गळणे, भिंतीचा सज्जा कोसळणे, जिन्यांची दुरवस्था अशा अनेक समस्या पोलिसांना या ठिकाणी भेडसावत होत्या.