वडाळा येथील खोदकामाप्रकरणी दोस्ती बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिवास धोका निर्माण होईल, असे जाणीवपूर्वक बेदरकारपणे खोदकाम केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अँटॉप हिल परिसरात असलेल्या लॉईड्स इस्टेटच्या कम्पाऊंड जवळ असलेला मोठा भाग सोमवारी पहाटे कोसळला. त्यात जवळपास १५ कार दबल्या होत्या. शेजारी सुरू असलेल्या बांधकामुळे ही दुर्घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. ‘दोस्ती एकर्स’ ला महापालिका अधिकाऱ्यांनी पाठीशी घातल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप देखील स्थानिकांनी केला होता.

अखेर, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिपक गरोडिया, किसन गरोडिया राजेश शहा यांच्या विरोधात भारतीय दंड विधानातील कलम २८७, ३३६, ४३१ आणि ४२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी लॉईड इस्टेट लगतच्या जागेत यंत्र सामुग्रीच्या सहाय्याने मानवी जिवास धो धोक्यात येईल असे जाणीवपूर्वक बेदरकारपणे खोदकाम सुरू केले. यामुळे जिवास धोका निर्माण करणे तसेच मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wall collapses at lloyds estate in wadala dosti realty builder booked
First published on: 25-06-2018 at 16:50 IST