पांजरापूर येथील विद्युत उपकेंद्रातील कामे हाती घेण्यात येणार असून त्यामुळे २१ आणि २२ जानेवारी रोजी उदंचन केंद्र बंद ठेवावे लागणार आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशी कुलाबा ते दादर, तसेच घाटकोपर, कुर्ला, मुलुंड, भांडूप परिसरात ५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. पांजरापूर येथील विद्युत उपकेंद्रात करंट व पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर्स बदलण्याचे काम २१ आणि २२ जानेवारी रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशी उदंचन केंद्र बंद ठेवावे लागणार आहे. परिणामी वरील सर्व परिसरात पाच टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.