लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : महानगरपालिकेकडून २९ आणि ३० मे रोजी बी. डी. पाटील मार्ग, वाशी नाका येथे ४५० मिलीमीटर व ७५० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील काही भागांत २९ मे रोजी चोवीस तास पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. तसेच, पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Water supply cut off on May 27 and 28 in some parts of western suburbs
पश्चिम उपनगरांतील काही भागात २७, २८ मे रोजी पाणीपुरवठा बंद
Mumbai, Water supply,
मुंबई : पूर्व उपनगरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद; चेंबूर, गोवंडी, देवनारमध्ये पाणी नाही
Supply Disruption 16 Hours, Water Supply Disruption in Andheri, Water Supply Disruption in Jogeshwari,
मुंबई : अंधेरीत २२ मे रोजी १६ तास पाणीपुरवठा बंद, आसपासच्या विभागांतील पाणीपुरवठाही खंडित होणार
Water supply stopped in Andheri on May 29 and 30 water supply with low pressure in some areas
अंधेरीत २९, ३० मे रोजी पाणीपुरवठा बंद, काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा
loksatta analysis why when and how water supply cut impose in mumbai
विश्लेषण : मुंबईत का, कधी आणि कशी केली जाते पाणी कपात?
Light rain forecast for four days in Mumbai
मुंबईत चार दिवस हलक्या पावसाचा अंदाज
water supply remains closed in ghatkopar bhandup and mulund on 24 may
घाटकोपर, भांडुप व मुलुंडमध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”

या भागात पाणीपुरवठा बंद

१) एम पूर्व विभाग (बीट क्रमांक १४७ ते १४८) – लक्ष्मी वसाहत, राणे चाळ, नित्यानंद बाग, तोलाराम वसाहत, श्रीराम नगर, जे. जे. वाडी, शेठ हाइट्स, डोंगरे पार्क, टाटा वसाहत, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बी. पी. सी. एल.) वसाहत, एच. पी. सी. एल. वसाहत, गवाणपाडा, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एच. पी. सी. एल.) रिफायनरी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, टाटा पॉवर थर्मल प्लांट, बी. ए. आर. सी., वरुण बेवरेजेस (२९ मे रोजी सकाळी १० ते ३० मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील)

आणखी वाचा-घाटकोपर दुर्घटनेनंतर बेकायदा फलकांबाबत जाग आली का? उच्च न्यायालयाचे सिडकोला खडेबोल! योग्य ते धोरण आखण्याचे आदेश

२) एम पश्चिम विभाग (बीट क्रमांक १५४ ते १५५) – माहुलगाव, आंबापाडा, जिजामाता नगर, वाशी नाका मैसूर वसाहत, खाडी मशीन, आर. सी. मार्ग, शहाजी नगर, कलेक्टर वसाहत, सिंधी वसाहत, लालडोंगर, सुभाषचंद्र बोस नगर, नवजीवन सोसायटी, ओल्ड बराक चेंबूर छावणी (२९ मे रोजी सकाळी १० वाजेपासून ३० मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील)