दहावी-बारावीनंतर करायचे काय, करिअर निवडायचे ते कोणते आणि कसे  हा जितका महत्त्वाचा, तितकाच गहन असा प्रश्न. त्याच्या नेमके योग्य उत्तर मिळाले की यशाचे दरवाजे उघडण्यास वेळ लागत नाही. त्यासाठी आवश्यकता असते ती योग्य मार्गदर्शनाची. हे लक्षात घेऊनच लोकसत्ताने ‘मार्ग यशाचा’ या खास परिसंवादाचे आयोजन केले आहे.
दहावी-बारावीनंतरत्या विविध विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांची आणि करिअर निवडीच्या तंत्राची सविस्तर ओळख करून देणारा हा विद्यालंकार प्रस्तुत ‘लोकसत्ता- मार्ग यशाचा’ परिसंवाद रवींद्र नाटय़ मंदिर येथे येत्या २९ व ३० मे रोजी होणार आहे. आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्सच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादाचे उद्घाटन २९ मे रोजी राज्याचे शालेय व उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. डोंबिवली नागरी सहकारी बँक या कार्यक्रमाची ‘बँकिंग पार्टनर’ आहे.   
असा असेल परिसंवाद..
या परिसंवादाच्या सुरुवातीच्या सत्रात पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या करिअरविषयक विभागाच्या प्रमुख नीलिमा आपटे ‘करिअर निवडताना..’ या विषयावर मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे ‘करिअरमधील सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व आणि विकास’ या विषयावर कॉर्पोरेट ट्रेनर गौरी खेर यांचे व्याख्यान होईल, तर ‘दहावी-बारावीनंतरचे अभ्यासक्रम आणि करिअरसंधी’ या विषयावर ज्येष्ठ करिअर समुपदेशक विवेक वेलणकर मार्गदर्शन करतील. यापैकी कुठल्याही एके दिवशीप्रतिव्यक्ती ५० रु. प्रवेशशुल्क आकारले जाईल.
प्रवेशिकांसाठी..
सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमाच्या प्रवेशिका पुढील ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध आहेत- रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी, मुंबई. विद्यालंकार हाऊस, प्लॉट क्र. ५६, हिंदू कॉलनी, पहिली गल्ली, दादर (पूर्व). अधिक माहितीसाठी संपर्क – ०२२- ६७४४०३६९/३४७

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Way to success loksatta marg yashacha
First published on: 28-05-2015 at 03:37 IST