आम्ही कोणताही घोटाळा केला नाही असं स्पष्टीकरण आता पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी म्हटलं आहे. PMC बँकेचे MD जॉय थॉमस यांनी पत्रकार परिषद घेत बँकेची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्यासाठी आपण जबाबदार असल्याचं त्यांनी सांगितलं मात्र HDIL संबंधी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. बँकेने कोणताही घोटाळा केला नसल्याचं स्पष्टीकरणही यावेळी त्यांनी दिलं.

PMC बँकेकडून गेल्या 6 ते 7 वर्षात मंजूर करण्यात आलेल्या कर्जाची माहिती Classification Of Portfolio मुळे देण्यात आली नसल्याचं जॉय थॉमस यावेळी सांगितलं. तसेच HDIL ला कर्ज देण्यामागे कोणतीही राजकीय संबंध नव्हते अशी माहिती त्यांनी दिली.

आम्ही RBI कडे मदत मागण्यासाठी गेलो होतो. पण त्यांनी आमच्यावर कारवाई केल्याने आम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी आम्हाला वेळ द्यायला हवा होता. हे सर्व अजून योग्य पद्धतीने खातेदार, ग्राहकांना त्रास न देता करता आलं असतं अस त्यांनी सांगितलं. RBI ला यासंबधी आधी कल्पना देण्यात आली होती का यावर मात्र त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं नाही. यावेळी त्यांनी पैसे काढण्याची मर्यादा १ लाखांपर्यंत वाढवली जाणार असल्याचीही माहिती दिली.

मुंबईस्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. २३ सप्टेंबर पासून हे निर्बंध लागू झाले आहेत. बँकेची सद्यस्थिती पाहून ग्राहकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणल्याचं रिझर्व्ह बँकेने आपल्या आदेशात नमूद केलं. या संपूर्ण प्रकरणी आज बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी बँकेने कोणताही घोटाळा केला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.  आमच्या खातेदारांनी पैसे काढलेले नाहीत. मी जे काही घडलं त्याबाबत आमच्या खातेदारांना मुळीच दोष देणार नाही असंही थॉमस यांनी स्पष्ट केलं.