मुंबई :  मालाड येथील बाणडोंगरी परिसरात दरड कोसळल्याने आठवडय़ापासून बंद असलेली पश्चिम द्रुतगती मार्गावरील मार्गिका मंगळवारी खुली करण्यात आली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने(एमएमआरडीए) वाहतूक सुरू करण्याबाबत सकारात्मक अहवाल दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवडय़ात मंगळवारी बाणडोंगरी परिसरात, पश्चिम द्रुतगती मार्गावर दरड कोसळली. कोसळलेल्या ढिगाऱ्याने बोरिवलीकडून वांद्रेकडे येणाऱ्या(दक्षिणमुखी) मार्गिका व्यापली. ढिगारा उपसेपर्यंत ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आली. ढिगारा उपसल्यावर सुरक्षा आढावा घेण्यात आला. वाहतूक पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या परिसरात आणखी काही ठिकाणी दरडी आहेत. अपघातानंतर पुढील काही दिवस मुंबईत मुसळधार पाऊस, सोसाटय़ाचा वारा आदी अंदाज वेधशाळेने वर्तविला होता. सुरक्षितता म्हणून एमएमआरडीएने आयआयटीसह अन्य खासगी यंत्रणांमार्फतही मार्गिके वरून वाहतूक सुरू करता येईल का, याचा आढावा घेतला. सोमवारी एमएमआरडीएकडून सकारात्मक अहवाल मिळाल्यानंतर मंगळवारपासून या मार्र्गिके वरून वाहतूक सुरू के ली.

आठवडय़ाच्या कालावधीत पोलिसांनी  विरुद्ध मार्गावरून म्हणजे वांद्रेकडून दहिसर दिशेने जाणाऱ्या(उत्तरमुखी) मार्गिके वरून वाहने सोडली. तसेच एस. व्ही. मार्गावरून वाहतूक वळवली. मात्र सकाळी आणि संध्याकाळी, घाईच्या वेळेत पर्यायी व्यवस्था अपुरी पडल्याने वाहतूक कोंडी होऊ लागली. त्याचा फटका प्रवाशांना बसत होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Western express highway open for vehicles zws
First published on: 12-08-2020 at 02:46 IST