लोकल गाड्यांच्या दरवाजातून खाली पडल्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी लवकरच रेल्वे गाड्यांना स्वयंचलित दरवाजे लावण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेमार्गावर महिलांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात सुरूवातीला प्रायोगिक तत्त्वावर स्वयंचलित दरवाजांची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानूसार, बोरिवलीकडे जाणाऱ्या लोकलमधील प्रत्येकी एका डब्याला स्वयंचलित दरवाजा असणार आहे. येत्या रविवारपासून पश्चिम रेल्वेमार्गावर अशाप्रकारच्या लोकल गाड्या धावताना पहायला मिळतील.
त्यामुळे येणाऱ्या काळात रेल्वेच्या दरवाज्यांना लोंबकाळणाऱ्या गर्दीचे दृश्य नामशेष होण्याची चिन्हे आहेत. रेल्वे स्थानकातून गाडी निघण्यापूर्वी हे दरवाजे आपोआप बंद होतील. त्यानंतर ज्या बाजूला रेल्वे स्थानक येणार असेल त्याबाजूला स्वयंचलित पद्धतीने हे दरवाजे उघडले जातील. येणाऱ्या काळात हा प्रयोग कितपत व्यवहार्य ठरतो, यावर सर्व गाड्यांना स्वयंचलित दरवाजे लावण्याच्या पर्यायावर विचार केला जाईल.
गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतील लोकल ट्रेनमधून पडून अपघातांची संख्या वाढली आहे. या अपघातांमध्ये अधिक प्रमाणात ट्रेनच्या दरवाज्यात उभे राहणारे असतात. लोकलच्या डब्यातील गर्दीमुळेही अनेकवेळा एखादा प्रवासी दरवाज्यातून बाहेर पडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Western railway introduces automatic sliding door for local trains between borivali
First published on: 13-03-2015 at 05:29 IST