राष्ट्रवादीकडून खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली आहे. अशातच प्रफुल्ल पटेल यांनी मोठा धक्का देत नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त केलं आहे. त्यांच्याऐवजी सुनिल तटकरे नवे प्रदेशाध्यक्ष असतील, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मी जयंत पाटलांना अधिकृतरित्या कळवलं आहे की, प्रदेशाध्यक्ष पदावरून त्यांना मुक्त करतो. त्यांच्याजागी सुनिल तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करत आहे. अपात्रतेची कारवाई पक्षाद्वारे होऊ शकत नाही. निवडणूक आयोगाकडे याचा अधिकार नाही.”

हेही वाचा : ९ आमदारांना राष्ट्रवादीचे दरवाजे बंद, इतरांसाठीही काही काळ किलकिले – जयंत पाटील

“अजित पवार यांची विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात येत आहे. अनिल पाटील यांनाच ठेवण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून कळवलं आहे,” असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

यावेळी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार असा सवाल विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, “राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत, आपण विसरलात का?”

हेही वाचा : विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचा दावा, जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले; म्हणाले, “सध्यातरी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शपथविधी झाल्यानंतर काही जणांनी विधाने केली होती, की कायद्यात न जाता जनतेत जाऊ. पण, रात्री १२-१२ वाजता पत्रकार परिषद घेऊन काही वेगळ्या घटना सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. याला काहीही अर्थ नाही. आम्ही घेतलेली भूमिका योग्य, रास्त आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भल्याची आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.