धावत्या लोकलमध्ये सुदेवी रामलाल पाल (३२) ही महिला मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता प्रसूत झाली. प्रसूतीसाठी ती पतीसोबत केईएम रुग्णालयात जाण्यासाठी कल्याणहून निघाली होती. विक्रोळी स्थानक येताच तिला प्रसूतिवेदना सुरू झाल्या आणि तिने डब्यातच बाळाला जन्म दिला. दरम्यान, गस्तीवरील रेल्वे पोलिसांना आणि स्टेशन मास्तरांना याची महिती मिळताच त्यांनी रुग्णवाहिका मागवली आणि सुदेवीला रुग्णालयात दाखल केले. सुदेवी आणि तिच्या बाळाची प्रकृती चांगली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Oct 2015 रोजी प्रकाशित
लोकलमध्येच प्रसूती
धावत्या लोकलमध्ये सुदेवी रामलाल पाल (३२) ही महिला मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता प्रसूत झाली.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
Updated:
First published on: 14-10-2015 at 00:09 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman has delivery in train