पवईतील हनुमान नगर परिसरात पोलिसांना रविवारी एका महिलेचा मृतदेह सापडल्याने या परिसरात खळबळ उडाली. ललिता चौहान (वय २७) असे या महिलेचे नाव असून या मृतदेहावर अनेक जखमा आढळल्याने बिबटय़ाच्या हल्ल्यामध्ये तिचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रविवारी पवईतील जंगला जवळ हा मृतदेह जखमी अवस्थेत पोलिसांना सापडला आणि त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात ही महिला २१ डिसेंबरपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली.यापूर्वीही अशाप्रकरे बिबटय़ाच्या हल्ल्यात या परिसरात अनेक जणांनी आपला जीव गमवला असल्याचे पोलीस सांगत आहेत. या संदर्भात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2012 रोजी प्रकाशित
बटय़ाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
पवईतील हनुमान नगर परिसरात पोलिसांना रविवारी एका महिलेचा मृतदेह सापडल्याने या परिसरात खळबळ उडाली. ललिता चौहान (वय २७) असे या महिलेचे नाव असून या मृतदेहावर अनेक जखमा आढळल्याने बिबटय़ाच्या हल्ल्यामध्ये तिचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
First published on: 31-12-2012 at 01:53 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman killed by cheetah