बहिणीला भेटण्यासाठी मुंबईत आलेली महिला शनिवारी लोकलमध्ये चढत असताना तिचा हात सटकल्याने फलाट आणि लोकलच्यामधल्या जागेत पडली आणि या दुर्घटनेत तिला दोन्ही पाय गमावावे लागले. खार रेल्वेस्थानकावर ही दुर्घटना घडली.
दीपाली दीपक पात्रे (५४) ही महिला रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या गावाहून बहिणीला भेटण्यासाठी मुंबईत आली होती. माहिम येथून बहिणीसह त्या खार येथे अनिरुद्ध बापूंच्या कार्यक्रमासाठी गेल्या. तेथून परत माहीमला येत असताना खार रेल्वेस्थानकावर या दोघांनी लोकल पकडली. पण गाडीत चढत असताना गडबडीत दीपाली यांचा हात सटकला आणि त्या खाली पडल्या. लोकल आणि फलाटाच्या मध्ये असणाऱ्या जागेत त्या खेचल्या गेल्या. ते पाहताच लोकांनी आरडाओरडा केला. अपघाताची कल्पना येताच मोटरमनने लागलीच गाडी थांबवली. दीपाली यांना बाहेर काढण्यात आले आणि भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात दीपाली यांचा जीव वाचला पण दोन्ही पाय मात्र गमवावे लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman lost legs in railway accident at mahim
First published on: 13-10-2013 at 04:01 IST