चिमणी वाचवा, घरटी बांधायला जागा द्या!
आठवते का गं तुला, ती चिवचिवाट करणारी चिमणी? आजीने दाखविलेला, इकडे तिकडे मान फिरवीत चिवचिव करणारा व आजीच्या कडेवरून डुगुडुगु मान सावरत तू बोळकं पसरून, हसून स्वागत केलेला तो इवलासा पक्षी म्हणजेच चिऊताई.
गेल्या काही वर्षांच्या काळात आपल्या घरात व अंगणात दाणे टिपणारी चिमणी अचानक जी भुर्र्र उडून गेली आहे ती परत आलेली नाही. त्याला हवामानातील बदल, मोबाइल टॉवरची प्रारणे अशी एक ना अनेक कारणे सांगितली जातात. ‘जागतिक चिमणी दिना’निमित्त ‘लोकसत्ता डॉट कॉम’वरील चिमणी विषयीच्या काही लिंक वाचकांसाठी येथे देत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा