लष्करात नुकताच भरती झालेल्या २२ वर्षांच्या तरुणाने शनिवारी नेव्ही नगर येथील लष्करी रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागील नेमके कारण उघड झालेले नाही.
जयवीर सिंह असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा नाशिक येथील आहे. पोटाच्या विकारासाठी जयवीर याला आयएनएस अश्विनी लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्याचा गळफास लावलेला मृतदेह रुग्णालयाच्या खोलीत आढळून आला. लष्कर प्रशासनाने याबबतची माहिती मुंबई पोलिसांना दिल्यानंतर पंचनामा करण्यात आला. प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहितीही लष्करी सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth suicide in the army hospital
First published on: 22-11-2015 at 00:01 IST