आचार्य नंदिकेश्वरांनी लिहिलेल्या अभिनयदर्पण या ग्रंथामधील ‘पात्रलक्षण आणि पात्रप्राण’ या दोन श्लोकांचे विवेचन आपण मागील एका लेखामध्ये पाहिले. आजच्या लेखातही अशाच दोन श्लोकांचे अर्थ आपण उलगडणार आहोत. नृत्य आणि त्याच्याशी निगडित विविध पैलूंचा विचार आचार्य नंदिकेश्वरांनी अभिनयदर्पण ग्रंथामधून मांडला आहे. असाच एक विषय म्हणजे ‘नटन भेद’. नाटय़, नृत्त आणि नृत्य असे तीन नटनांचे भेद असून त्यांच्या अर्थाचा घेतलेला हा आढावा.

‘नाटय़ं तन्नाटकं चैव पूज्यं पूर्वकथायुतमे

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
kolhapur lok sabha seat, sanjay mandlik, sanjay mandlik controversial statement, shahu maharaj, historians criticise sanjay mandlik, shivsena, bjp, congress, lok sabha 2024, election 2024, mahayuti, maha vikas aghadi, kolhapur politics, kolhapur shahu maharaj, controversial statment on shahu maharaj,
छत्रपतींच्या गादीचा मंडलिकांकडून अवमान; इतिहास संशोधकांनी व्यक्त केला निषेध
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

भावाभिनयहीनं तु नृत्तमित्यभिधीयते

रसभावव्यंजनादि युक्तं नृत्यामितीयते

एतन्नृत्यं महाराजसभायां कल्पयेत सदो

या दोन श्लोकांमध्ये नाटय़, नृत्त आणि नृत्य या तिन्हींची व्याख्या सांगितली आहे. या श्लोकाप्रमाणे पूर्वजांच्या पूजनीय अशा कथांचा समावेश असलेले नाटक म्हणजेच ‘नाटय़’, ज्यात भाव आणि अभिनयाची अपेक्षा नाही असे ‘नृत्त’ आणि रस भाव आणि सूचकतेने परिपूर्ण असते ते ‘नृत्य’ अशा नाटय़, नृत्त आणि नृत्याच्या क्रमश: व्याख्या मिळतात.

या श्लोकात नंदिकेश्वरांनी पुराणातील पूजनीय व्यक्तींच्या महनीय कथांवर आधारलेल्या नाटकांनाच नाटय़ म्हणावे असे म्हटले आहे. पण नृत्याबद्दलचे विवेचन लिहिताना नृत्यात नाटय़ कशाला किंवा नृत्यातील कुठल्या घटकाला नाटय़ म्हणावे याचे स्पष्टीकरण केले नाहीये. (इथे ‘नृत्य’ हा शब्द डान्स या अर्थाने वापरला आहे.) आज आपण पाहतो त्या शास्त्रीय नृत्यशैलींपैकी कथकली वगळता एकाही शैलीमध्ये ती शैली कितीही शास्त्रधिष्ठित असली तरीही या व्याख्येप्रमाणे नाटय़ नसते. आजच्या शैलीमध्ये नाटय़ त्या-त्या शैलीच्या अभिनयपक्षाच्या रूपात आपल्याला दिसते. यात नर्तक अथवा नर्तकी एखादे पद, साहित्यिक रचना घेऊन त्यावर किंवा पुराणातील/इतिहासातील एखादा प्रसंग घेऊन त्यावर अभिनय करतात. आजच्या काळात तर त्यातही विविध प्रयोग बघायला मिळतात. श्लोकात म्हटलेल्या ‘नाटक’ या संज्ञेचा अंक, प्रवेश, पात्र, पात्रानुसार वेशभूषा, संवाद अशा गोष्टींशी आजच्या नृत्याचा काहीही संबंध नाही. या व्यतिरिक्त आधुनिक संदर्भामध्ये शास्त्रीय नृत्यातील ‘नाटय़मयतेला’ नाटय़ म्हणू शकतो. उदा. एखादी पारंपरिक रचना सादर करताना त्यातील नक्की कोणत्या भागाची पढंत (नृत्याचे बोल म्हणणे) कशी केल्याने ती अधिक सुंदर वाटेल याचे भान ठेवून नृत्य करणे किंवा एखादे चलन चालू असताना अचानक त्यातील एकच भाग मूळ चलनाला साजेसा पण तरीही त्यापेक्षा वेगळ्या आणि आकर्षक पद्धतीने सादर करून बघणाऱ्यास आश्चर्यमिश्रित आनंद देणे अशा गोष्टीत नृत्यातील नाटय़ दडले आहे. अजून पुढे जाऊन असे म्हणता येईल की, आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात एखाद्या नृत्यसंरचनेकरता वापरलेली विशिष्ट प्रकारची प्रकाशयोजना किंवा वेशभूषेचे विविध प्रकार, वैविध्यपूर्ण रंगसंगतीचा कल्पक वापर, रंगमंचाच्या अवकाशाची विभागणी किंवा परंपरेने चालत आलेल्या वस्तूंचा नावीन्यपूर्ण वापर या आणि अशा अनेक बाबींमधून नृत्यातील नाटय़ आपल्यासमोर येते तेव्हा ‘नाटय़ाचा’ सौंदर्यपूर्ण आकस्मिकतेच्या रूपात नृत्यात समावेश होतो.

यानंतर येते ते ‘नृत्त’. याची व्याख्या नंदिकेश्वरांनी ज्यात भाव आणि अभिनयाची अपेक्षा नाही ते नृत्त अशी केली आहे. याचाच अर्थ नृत्त म्हणजे नटनाचा असा भेद ज्यात भाव आणि अभिनयाची अपेक्षा नाही परंतु सौंदर्याची आहे. आता प्रश्न असा आहे की हे सौंदर्य कशाचे? तर नृत्ताचे सौंदर्य त्यातून प्रकट होणाऱ्या ऊर्जेचे, ऊर्जेच्या नियंत्रणाचे, रेषांचे, त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या आकृतिबंधाचे, या रेषा-बिंदू-आकृतिबंधातून व्यक्त होणाऱ्या लयीचे-तालाचे, त्या लयीच्या-तालाच्या ध्वनीचे- ध्वनिबंधाचे! हे सर्व म्हणजे नृत्त. आधुनिक काळात जसा नृत्यशैलींचा भावपक्ष म्हणजे त्यातील नाटय़, तसेच त्यातील ताल पक्ष म्हणजे त्यातील नृत्त. यात समावेश होतो तो कथक नृत्यातील विविध प्रकारच्या तुकडय़ांचा, तिहाई, गिनती, ततकारांचा, निरनिराळ्या बंदिशींचा, तराण्यासारख्या गानप्रकारांचा तर भरतनाटय़ममधील तिल्लाना या रचनेचा.

आता राहिले ते ‘नृत्य’. रस, भाव, आणि व्यंजना यांनी युक्त नटनाचा भेद म्हणजे नृत्य असे म्हटले आहे. म्हणजेच नृत्याचा असा भाग ज्यात निरनिराळे भाव व्यक्त होऊन प्रेक्षकांपर्यंत त्यातील आनंद पोहचवण्याची क्षमता असते आणि ज्यात सूचकता असते ते ‘नृत्य’. उदा. नर्तक अथवा नर्तकी यशोदा कृष्णाचा माखनचोरीचा प्रसंग प्रस्तुत करते. त्यात यशोदा कृष्णाला लोणी पळवल्याबद्दल रागवते, पण तो रडू लागल्यावर वाईट वाटून स्वत: त्याला लोणी भरवते. या सर्व प्रसंगातील प्रेमाचा भाव नर्तक आपल्या कुशल सूचकतेने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. परंतु असे करताना तो कुठेही वेशभूषेचा, पात्रप्रवेशांचा, संवादांचा आधार घेत नाही. या सर्वाचे कार्य तो सूचकतेने साधतो. उदा. यशोदा दाखवताना घुंघट घेतो, तर कृष्ण दाखवण्यासाठी मुद्रेने बासरी अथवा मोरपीस दाखवितो. तोच यशोदा आणि तोच कृष्ण होतो,  पान बघताना कुठेही प्रेक्षकांचा कोण कृष्ण कोण यशोदा असा गोंधळ होत नाही. अगदी नर्तकाने सारखा घुंघट अथवा बासरी धरून निर्देश केला नाही तरीही. शास्त्रीय नृत्याशैलींमध्ये गत्भाव गझल, ठुमरी, भजन इ.सारखे प्रकार नृत्य या सदरात सामाविष्ट होतात, कारण त्यात भाव असतो, लोकरंजन करण्याची क्षमता असते आणि मुख्य म्हणजे सूक्ष्म सूचकता असते. आणि म्हणूनच नाटय़ आणि नृत्त अशा दोन्हीचाही समावेश असलेले नृत्य सर्वाच्या पसंतीस उतरते.
शीतल कपोले – response.lokprabha@expressindia.com