News Flash

आठ वर्षांच्या मुलीवर दहावीतील मुलाचा बलात्कार

पीडित मुलीचे वडील मजुरीचे काम करतात, तर आई उन्हाळ्यात निंबूपाणी विकण्याचा व्यवसाय करते.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

आठ वर्षांच्या चिमुकलीवर १६ वर्षांच्या मुलाने बलात्कार केल्याची गंभीर घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वानाडोंगरी परिसरात सोमवारी उघडकीस आली. आरोपी मुलाने नुकतीच दहाव्या वर्गाची परीक्षा दिली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे.

पीडित मुलीचे वडील मजुरीचे काम करतात, तर आई उन्हाळ्यात निंबूपाणी विकण्याचा व्यवसाय करते. तिला साडेचार वर्षांचा लहान भाऊही आहे. मुलगी तिसऱ्या वर्गात शिकत आहे. त्यांचे कुटुंब पूर्वी आरोपीच्या घरी भाडय़ाने राहत होते. मात्र, तीन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांनी आरोपी मुलाच्या घरापासून काही अंतरावर एक झोपडी विकत घेतली. तेव्हापासून ते तेथे राहतात. आरोपीचे वडील सुरक्षा रक्षक आहेत. मुलाचे पीडित मुलीकडे येणे-जाणे होते. गेल्या महिनाभरापासून पीडित मुलीचे आईवडील आपापल्या कामावर असतात आणि दुपारी मुलगी आपल्या लहान भावासह घरात असायची. त्यावेळी आरोपी हा तिच्या घरी येत होता. तीन दिवसांपासून वारंवार तो तिच्यावर बलात्कार करायचा. तिला काहीच कळत नसल्याने ती शांत होती. मात्र, रविवारी तिच्या गुप्तांगात दुखू लागले. तिने तिच्या आईकडे दुखत असल्याचे सांगितले. तिची आई तिला डॉक्टरकडे घेऊन गेली. त्यावेळी डॉक्टरने तिच्यासोबत अत्याचार झाल्याचे तिच्या आईला सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात हवालदार कैलास पवार यांनी बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2018 2:50 am

Web Title: 10th standard raped on eight years girl
Next Stories
1 .. तर काँग्रेस आमदारांचे अपहरण झाले असते!
2 …तर शिवसेनेत मोठी फूट पडेल, रामदास आठवलेंचा इशारा
3 संविधानाला धक्का लावल्यास भाजपाची साथ सोडू
Just Now!
X