News Flash

झाडाला आदळून गाडीने पेट घेतला, एकाचा होरपळून मृत्यू

शॉर्टसर्किट होऊन वाहनाने पेट घेतला.

वर्धा-नागपूर राज्य मार्गावर झाडाला धडक दिल्याने शॉर्टसर्किट होऊन पेट घेतलेल्या बोलेरो गाडीत एकाचा होरपळून मृत्यू झाला.

वर्धा-नागपूर राज्य मार्गावर झाडाला धडक दिल्याने शॉर्टसर्किट होऊन पेट घेतलेल्या बोलेरो गाडीत एकाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.

अधिक माहिती अशी, वर्धा-नागपूर राज्य मार्गावरून बोलेरो गाडी जात होती. केळझर (ता. सेलू) येथे आल्यानंतर चालकाला झोप अनावर झाल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट सामाजिक वनीकरणसमोर असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला धडकली. धडक इतकी जबर होती की, गाडीत शॉर्ट सर्किट झाले आणि गाडीने लगेचच पेट घेतला. चालकाच्या बाजूला बसलेली व्यक्ती गाडीतच फसली. वेळीच मदत न मिळाल्याने त्या व्यक्तीचा जागीच होरपळून मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याने वाहनात किती व्यक्ती होते व मृत्यू पावणारी व्यक्ती कोण याची माहिती उशिरापर्यंत समजू शकले नव्हते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 5:11 pm

Web Title: after accident jeep set a fire one dead near nagpur
Next Stories
1 नागपूरजवळ टिप्पर-एसटी आणि कारचा विचित्र अपघात
2 भारतात वैद्यकीय पर्यटनाची प्रचंड क्षमता
3 मनोरुग्णांच्या जीवनात हास्य फुलवणारे ‘स्माईल प्लस’
Just Now!
X