वर्धा : बाहेर जिल्ह्यातील नेत्यांवर जिल्हा सोडण्याचे आदेश आहे. पण तरीही भाचा अमर काळे यांच्यासाठी आज दुपारी हजर झालेले त्यांचे मामा अनिल देशमुख यांनी मतदारसंघात हजेरी लावल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याचे सुतोवाच अधिकारी करत आहेत.
माजी मंत्री अनिल देशमुख हे दुपारी साडेतीन इवाजता हिंगणघाट बाजार समिती परिसरात उपस्थित झाले. त्यांनी पक्ष नेत्यांशी चर्चा पण केली. याची कुणकुण भाजप पदाधिकाऱ्यांना लागली. त्यांनी तशी तक्रार जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याकडे सहा वाजता केली. तक्रारीवार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरू असल्याचे उत्तर जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिले.
हेही वाचा >>>वाशीम जिल्ह्यात सरासरी ६० टक्के मतदानाचा अंदाज
बाहेरील मतदारसंघातील प्रभावी नेत्यांनी दुसऱ्या मतदारसंघात प्रवेश करू नये, असे आदर्श आचारसंहिता सांगते. त्या नुसार अमर काळे यांच्यासाठी प्रचार सूत्रे सांभाळणारे अनिल देशमुख, सुनील केदार, अभिजित वंजारी यांनी मतदारसंघ सोडला होता.
पण आज मामा अनिल देशमुख यांनी भाचे प्रेमापोटी मतदारसंघात जाम मार्गे हिंगणघाट येथे उपस्थिती लावली. ते दृष्य भाजप पदाधिकारी व अन्य लोकांनी पाहले. हे कसे चालणार म्हणून मग तक्रार देण्यात आली.
हिंगणघाट पोलीस आता कार्यवाही करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.