लोकसत्ता टीम

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अकोला लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदारसंघात सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. ५२.६९ टक्के मतदारांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत झाली. शहरीच्या तुलनेत ग्रामीण भागातील मतदार अधिक सजग असल्याचे दिसून आले.

akola lok sabha marathi news, akola loksabha voter turnout marathi news
अकोल्यात मतदानाच्या टक्केवारीत वाढ, एकूण अंतिम मतदान ६१.७९ टक्क्यांवर
Akola Lok Sabha Constituency, Lok Sabha Election 2024 Voting Updates in Marathiprakash ambedkar, anup dhotre, dr abhay patil, voted, 7 percent in first two hours, marathi news, polling in akola, voting in akola,
Akola Lok Sabha Election 2024 : अकोल्यात पहिल्या दोन तासात ७.१७ टक्के मतदान; उमेदवार प्रकाश आंबेडकर, अनुप धोत्रे, डॉ. अभय पाटील यांनी बजावला हक्क
Rohit Pawar vs Ravi Rana over amravati rally
“फक्त ३०० मिळाले? नवनीत राणांच्या सभेसाठी महिलांना पैसे दिले?”, रवी राणा म्हणाले, “हो पैसे वाटले…”
Akola Lok Sabha constituency, MLA s Reputations at Stake , vidhan saba constituency, votes will Decisive, mp s Election, bjp, vanchit bahujan aghadi, congress, lok sabha 2024, election 2024,
अकोला : लोकसभा निवडणुकीत आमदारांची कसोटी, विधानसभा मतदारसंघनिहाय मतांचे गणित निर्णायक

अकोला मतदारसंघातील दोन हजार ०५६ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. मतदारसंघात एकूण १८ लाख ९० हजार ८१४ मतदार असून, नवमतदारांमध्ये सकाळपासून उत्साहाचे वातावरण होते. सकाळी ७ ते ९ या कालावधीत ७.१७ टक्के मतदान झाले. मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. मतदारांनी केंद्रांवर गर्दी केली होती. सकाळी ११ वाजेपर्यंत १७.३९ टक्के, तर दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ३२.१५ टक्क्यांवर पोहोचली. दुपारी ३ वाजेपर्यंत ४२.४०, तर ५ वाजेपर्यंत ५२.६९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

आणखी वाचा-वर्धा : शहरी तुलनेत ग्रामीण भागात टक्का वाढला, महिला मतदारांमध्ये निरुत्साह

एकूण टक्केवारी ६० पर्यंत जाण्याचा अंदाज असून रात्री उशीरा निवडणूक विभागाकडून अधिकृत आकडेवारी जाहीर केली जाईल. दुपारी ५ वाजेपर्यंत झालेल्या मतदानात बाळापूर मतदारसंघात सर्वाधिक ५७.६५, तर अकोला पश्चिममध्ये सर्वात कमी ४७.३८ टक्के मतदान झाले होते. याशिवाय अकोट ५२.३०, अकोला पूर्व ४९.१०, मूर्तिजापूर ५६.९३ आणि रिसोड मतदारसंघात ५३.७९ टक्के मतदान झाले होते. मतदार यंत्रात बिघाडाच्या काही किरकोळ घटना समोर आल्या. त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यात आली.

मतदारसंघातील १५ उमेदवारांचे भाग्य यंत्रबंद झाले आहे. अकोला मतदारसंघात भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व वंचित आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत आहे. उमेदवारांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीवर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून होते. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विशेष जनजागृती करण्यात आली होती. महिला, दिव्यांग, युवा महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे संचालित विशेष मतदान केंद्रे आणि १९ आदर्श मतदान केंद्रे आकर्षणाचा विशेष केंद्रबिंदू ठरले.

आणखी वाचा-नवनीत राणांच्या मतदान केंद्रातील प्रवेशावर माजी नगरसेविकेचा आक्षेप; नियम सांगत म्हणाल्या…

केंद्रावर उमेदवाराच्या मतदार पावत्या

मतदानापूर्वी प्रशासनासह उमेदवारांनी मतदार पावत्याचे वाटप केले होते. त्या मतदार पावतीवर उमेदवाराचे छायाचित्र, नाव व चिन्हाचा समावेश होता. अनेक मतदार उमेदवाराच्या त्या मतदार पावत्या घेऊन मतदान केंद्रावर दाखल झाले होते. मतदार केंद्राच्या परिसरात त्याला बंदी असतांना कोणीही त्यांना रोखले नाही.

अनेक मतदारांचे नावे गायब

अकोला मतदारसंघात असंख्य मतदारांचे नावे मतदार यादीतून गायब असल्याचे आढळून आले. अनेक मतदारांनी ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणी केली होती. मात्र, त्यांची नावे मतदार यादीत आली नाही. त्यामुळे केंद्रावर दाखल होऊनही यादीत नाव नसल्याने असंख्य मतदारांना निराश होऊन परतावे लागले.

आणखी वाचा-बुलढाणा : मतदानयंत्र बिघडल्यामुळे अनेक ठिकाणी मतदान खोळंबले… यंत्रणांची धावपळ…

वर-वधू, नवमतदार, दिव्यांग, वयोवृद्धांमध्ये उत्साह

शहरात व ग्रामीण भागात सकाळी ७ पूर्वीच मतदान केंद्रावर रांगा लावण्यात सुरुवात झाली होती. वृद्ध, महिला, तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार यांच्याबरोबरच मतदानासाठी नवमतदारांचाही उत्साह दिसून आला. आज लग्नाचा मुहुर्त असल्याने अनेक वधु-वरांनी विवाह सोहळ्यापूर्वी मतदान केंद्रावर पोहोचून आपले राष्ट्रीय कर्तव्य निभावले. १०२ वर्षीय भावजी रावजी पोहरकर यांनी तेल्हारा केंद्रावर मतदान केले.