शहर  स्वच्छतेसाठी कोटय़ावधी रुपये खर्च करूनही नागपूरला अन्य शहराच्या तुलनेत यश आले नाही.

केंद्रीय नगरविकास खात्याने २०१५ मध्ये पहिल्यांदा स्वच्छ शहरांच्या बाबतीतले सर्वेक्षण केले. त्यात  ४७६ शहरांचा समावेश होता. यात नागपूरचा क्रमांक  २५६ वर होता. त्यानंतर २०१६ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात ७३ शहरांचा समावेश होता.यात नागपूर २३ व्या क्रमांकावर होते. त्यानंतर आता २०१७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात ४३४ शहरांचा समावेश करण्यात आला, ज्यात नागपूर १३७ व्या क्रमांकावर होते.

शहरात दररोज १ हजार टन कचरा जमा होतो. मात्र केवळ २०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे ८०० टन कचरा हा भांडेवाडीमध्ये साठवून ठेवला जातो आणि त्यात रोज वाढ असते. त्यामुळे अनेकदा शहरातील कचरा दररोज उचलला जात नाही. १७० ठिकाणी कचरा जमा करण्याचे ठिकाण शहरात आहे मात्र त्यातील अनेक ठिकाणचा कचरा एकेक आठवडा उचलला जात नाही. अनेकदा तो रस्त्यावर येत असतो.त्यासाठी जेवढे प्रशासन कारणीभूत आहे तेवढेच नागरिक आहेत. नागपूरमध्ये कनक आणि महापालिका मिळून सहा हजार सफाई कर्मचारी आहे मात्र त्या सफाई कर्मचाऱ्यांकडून काम करुन घेण्याचे आपल्याकडे नियोजन नाही.

सोसायटीमध्ये कचरा व्यवस्थापन  नाही

शहरातील विविध भागात सोसायटी आणि अनेक अपार्टमेंट आहे आणि त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात कचरा जमा होतो मात्र त्यांची व्यवस्था लावण्यात आली नाही.

शौचालय अवस्था वाईट शहरातील अनेक झोपडपट्टी भागात शौचालय बांधण्यात आले मात्र त्यातील अनेक शौचायलयाची अवस्था बघता लोक त्यात जाऊ शकत नाही. त्यामुळे अनेक लोक आजही उघडय़ावर शौचासाठी जातात आणि त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

हागणदारी मुक्ती कागदावर

हागणदारी मुक्त ही योजना राबविण्यात आली मात्र त्यात महापालिकेला यश आले नाही. सार्वजानिक शौचायलयाची अवस्था आपल्याकडे चांगली नाही आणि त्यातही आपण कमी पडलो आहे. अनेक शौचालय ही कंत्राटी पद्धतीने चालविली जात असली तरी त्यावर महापालिकेचे नियंत्रण नाही.

शहरातील स्वच्छतेबाबत महापालिकेने अनेक योजना राबविल्या आहेत मात्र लोकांनी त्यासाठी जागृत होणे गरजेचे आहे. कचरा जमा केल्यावर त्यांची प्रक्रिया आणि विल्हेवाटचा प्रश्न आपल्याकडे अजुनही सुटलेला नाही. खाजगी संस्थेकडे कचऱ्याचे व्यवस्थान देण्यात आले आणि इंदौरमध्ये महापालिका प्रशासनाने पुढाकार अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी काम करीत आहे. प्रशासनाने अधिक लक्ष देऊन सोयी सुविधा निर्माण करुन देणे गरजेचे आहे.नागपूर स्वच्छतेच्यादृष्टीने काम करीत आहे मात्र त्याला जनतेचा प्रतिसाद मिळाला तर इंदौरच्या तुलनेत आपले शहर स्वच्छ होईल आणि एक दिवस शहर पहिल्या क्रमांकावर येईल.

– प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी महापालिका

दररोज  कचरा निर्मिती

– १ हजार टन

प्रक्रिया  २०० टन

साठ़ळलेला  ८००

कचरा गोळा करण्याचे

ठिकाण  १७०

* सफाई कर्मचारी  -६  हजार