डेंग्यूच्या अळ्या सापडल्या तर फौजदारी कारवाई करू, असा इशारा देणाऱ्या महापालिकेपुढे  खुद्द सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्याच घरी अळ्या सापडल्याने काराईचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासन हे प्रकरण कसे  हाताळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात तीन महिन्यांपासून डेंग्यूसदृश्य आजाराची साथ पसरली आहे. सरकारी आणि खासगी दवाखान्यात रुग्णसंख्या वाढली आहे. जुलैमध्ये केलेल्या तपासणीत  २,७७३ घरात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या होत्या. आरोग्य विभागाकडे  १ ते १४ सप्टेंबर  या दरम्यान शहर आणि ग्रामीण भागात नवीन २७ डेंग्यूचे रुग्ण नोंदवले गेले. रुग्ण संख्याही १५४ वर पोहोचली आहे.

बुधवारी महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या मुलीला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या हिवताप पथकाने गुरुवारी जोशी यांच्या लक्ष्मीनगर येथील घरी फवारणी केली.  या दरम्यान त्यांना तेथील कुंडित तसेच  शेजारच्या घरीही  डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. याला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.

डेंग्यूचे रुग्ण

(१ ते १४ सप्टेंबर २०१८)

नागपूर (श.)- १३

नागपूर (ग्रा.)- १४

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dengue larvae found in ruling party leaders house
First published on: 21-09-2018 at 03:14 IST