वनविभागाची बोट पेटवली

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत तोतलाडोह जलाशयात अवैध मासेमारी करणाऱ्या मासेमारांनी रविवारी रात्री गस्ती पथकावर हल्ला के ला. यास कर्मचाऱ्यांनी प्रतिकार करताच शासकीय बोट पळवून नेत जाळली. या घटनेत वनखात्याचे सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

तोतलाडोह जलाशयात अवैध मासेमारीविरुद्ध गस्ती करण्यासाठी गेलेले विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे जवान १नोव्हेंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास दक्षिण बोदलझिरा नियत क्षेत्रातील तुमडीमट्टा संरक्षण कु टी येथे जेवण करण्यासाठी परतले. संधीचा फायदा घेत ३० ते ४० बोटींनी आलेल्या सुमारे ६० ते ७० मच्छिमारांनी गस्तीपथकाच्या संरक्षण कु टीला घेरले आणि शिवीगाळ करत जवानांवर दगडफे क सुरू के ली. काहींनी पत्र्याच्या झोपडीत शिरून शासकीय साहित्याची तोडफोड सुरू के ली. तसेच छतावर चढून सौर पॅनलची नासधूसही के ली. आत घुसलेल्या काही मासेमारांनी स्वयंपाकगृहातील सिलेंडर काढून स्फोट घडवण्याचा अयशस्वी प्रयत्न के ला. त्यामुळे सुरक्षेसाठी गस्ती पथकातील जवानांनी गोळीबार सुरू के ला. यानंतर मच्छीमारांनी पाण्यात उभी असलेली पथकाची बोट नेली आणि जाळली. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे अतिरिक्त मनुष्यबळ आल्यानंतर त्यांनी कु टीजवळच्या सर्व भागाची पाहणी करून कु टीत बंदिस्त जवानांची सुटका के ली. या घटनेची रितसर तक्रोर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून वनगुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे. तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक अमलेंद्रू पाठक यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक अतुल देवकर, वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे आणि क्षेत्र सहाय्यक एस.बी. के कान करत आहेत.

गेल्या महिनाभरापासून अवैध मासेमारीविरोधात पेंच व्याघ्र प्रकल्प मध्यप्रदेश व पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र अशा दोन्ही राज्याच्या अधिकाऱ्यांनी अवैध मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचा बंदोबस्त के ला होता.

रामटेकचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटय़ारे यांनी देखील तोतलाडोह जलाशयाला भेट देऊन पाहणी के ली. मध्यप्रदेश वनखात्याने ६ ऑक्टोबरला अवैध मासेमारी करुन मासे वाहतूक करणारी तीन वाहने जप्त के ली व पाच लोकांना अटक के ली होती. तर महाराष्ट्र वनखात्यानेही बोटी आणि जाळे जप्तीची कारवाई के ली होती. यामुळे चिडून मच्छीमारांनी हे कृ त्य के ले असावे असा अंदाज आहे. अवैध शिकार प्रतिबंधक कक्षाचे सहाय्यक वनसंरक्षक अतुल देवकर, विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे सहाय्यक वनसंरक्षक महेश परब आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकु टे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करीत वनकर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. याप्रकरणी देवलापार पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅ मेऱ्यात मच्छीमारांचे छायाचित्र आले असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संके त वन विभाग व पोलीस खात्याने दिले आहेत. दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांकडून गस्तीत वाढ करण्यात आली आहे. तसेच विशेष व्याघ्र संरक्षण दलाची अतिरिक्त कु मक मागवण्यात आली आहे.