नागपूर : निवृत्ती वेतनाकरिता ना हकरत प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त शिक्षकाकडून २० हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मुख्याध्यापक व वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाने (एसीबी) सोमवारी रंगेहाथ पकडले.

मुख्याध्यापक अनिल रामधन सगणे (५७) व वरिष्ठ लिपिक प्रशांत वामनराव कुरळकर (५२),अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत. ऑगस्ट २०२०मध्ये तक्रारदार हे सहाय्यक शिक्षक पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीच्या सहा महिन्यांपूर्वी शिक्षकाच्या निवृत्त वेतनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना (माध्यमिक) पाठवणे नियमानुसार बंधनकारक होते. परंतु तक्रारदाराचा प्रस्ताव मुख्याध्यापक व लिपिकाने पाठवला नाही. तक्रारदाराने मुख्याध्यापकाची भेट घेतली. मुख्याध्यापकाने लिपिकाला भेटायला सांगितले. लपिक कुरळकर यांना भेटले. त्यांनी शाळेच्या ना हरकत प्रमाणपत्रासह काही विवरणपत्रात काही राहिलेले मुद्दे भरून ते कोषागार कार्यालयात जमा करण्यास सांगितले. निवृत्त शिक्षकाने विवरण पत्र भरले. नाहकरत प्रमाणपत्र देण्यासाठी मुख्याध्यापक व लिपिकाने त्याला शाळेच्या देखभालीच्या नावाखाली २० हजार ५०० रुपये मागितले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली.

Syedna Mufaddal Saifuddin dawoodi bohra community
आठ वर्षं सुनावणी, वर्षभराची प्रतीक्षा..अखेर दाऊदी बोहरा उत्तराधिकारी वादावर न्यायालयाचा मोठा निकाल!
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश