नववर्षांच्या पूर्वसंध्येला पक्षी निरीक्षकांना अनोखी भेट

बीएनएचएस (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) आणि अ‍ॅक्सेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतात आढळणाऱ्या पक्ष्यांची प्रजाती ओळखण्यासाठी ‘इंटरनेट ऑफ बर्ड्स’ हे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. पक्षी निरीक्षकांनी कॅमेऱ्यात टिपलेली पक्ष्यांची प्रतिमा या सॉफ्टवेअरमध्ये टाकल्यावर लगेच त्या पक्ष्याची प्रजाती आणि संबंधित माहितीही समोर येते. पक्षी निरीक्षणात पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या पक्षी निरीक्षकांसाठी नवीन वर्षांच्या पूर्वसंध्येला दिलेली ही अनोखी भेट आहे.

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य

पक्षी निरीक्षकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरीही अनेकांना त्यांनी कॅमेराबद्ध केलेल्या पक्ष्यांची प्रजाती ओळखता येत नाही. मात्र, ‘इंटरनेट ऑफ बर्ड्स’ या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पक्षी निरीक्षकांनी कॅमेराबद्ध केलेली प्रतिमा त्यात टाकल्यावर या सॉफ्टवेअरमध्ये वापरलेल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लगेच पक्षी प्रजाती कळते. हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी अ‍ॅक्सेंचर कंपनीला बीएनएचएसने पक्ष्यांशी संबंधित बरीच माहिती पुरवली. भारत जैवविविधतेचे ‘हॉटस्पॉट’ मानला जातो. जगभरातील जैवविविधतेच्या सुमारे १२.५ टक्के जैवविविधता आणि पक्ष्यांच्या १३०० प्रजाती आहेत. सध्या या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ३०० प्रकारच्या पक्षी प्रजाती ओळखण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘इंटरनेट ऑफ बर्ड्स’ हे सॉफ्टवेअर कुणीही, कुठेही आणि नि:शुल्क वापरू शकतात. त्यामुळे पक्षी निरीक्षणातील नागरिकांचा सहभाग वाढेल व पक्षी प्रजाती त्यांना ओळखता आल्यामुळे निसर्ग संवर्धनातील त्यांचा सहभागही वाढण्यास मदत होणार आहे.

एखादा मोठा विषय हाताळण्यासाठी त्यात नावीन्य आणणे, नवनवीन प्रयोग करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपले काम मोठे करण्यासाठी अशा कृत्रिम बुद्धीमतेचा वापर करण्यावर आम्ही विश्वास ठेवतो. ‘इंटरनेट ऑफ बर्ड्स’ हे एक असेच व्यासपीठ असून यामुळे पक्षी प्रजाती ओळखण्याचे मोठे कार्य पार पाडले जाणार आहे.

-संजय पोड्डेर, व्यवस्थापकीय संचालक, अ‍ॅक्सेंचर लॅब, बंगळुरू

पक्षी हे पर्यावरणाचे उत्तम सूचक आहेत. ते कोठे आणि केव्हा आढळतात यावरून पर्यावरणाची माहिती कळते. या नव्या तंत्रज्ञानामुळे भारतातील नवीन पक्षी निरीक्षकांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यांनी कॅमेराबद्ध केलेल्या पक्ष्यांची प्रजाती त्यांना ओळखता येईल, तसेच निसर्ग संवर्धन कार्यक्रमातील त्यांचा सहभाग वाढणार आहे.

डॉ. दीपक आपटे, संचालक, बीएनएचएस