गुन्हेगार, व्यसनाधीन, अनाथ, भीक मागणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या वाटेवर आणून त्यांचे जीवन समृद्ध करणाऱ्या ‘प्रश्नचिन्ह’ शाळेचे संस्थापक मतीन भोसले यांनी या शाळेचा प्रवास प्रयास-सेवांकुर संस्थेच्या मदतीने रविवारी पुन्हा एकदा उलगडला.

[jwplayer vtVpMCjf]

sanjay raut arvind kejriwal
“केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”
केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
sangli lok sabha seat, nana patole, sanjay raut, congress, shivsena uddhav thackarey, lok sabha 2024, election 2024, maha vikas aghadi, conflict in maha vikas aghadi, maharashtra politics, maharashtra news, marathi news, sangli news, election news,
“संजय राऊत यांनी नाटके बंद करावी,” नाना पटोले यांचा सल्ला; म्हणाले, “त्यांनी छोट्या कार्यकर्त्यासारखे वागू नये…”
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना

मतीन यांची प्रकट मुलाखत अविनाश सावजी यांनी घेतली. सोबतच शाळेतील रोशनी, अंजली, योगेश, गोपाल यांचे अंगभूत कौशल्यही कार्यक्रमात सादर करण्याची संधी देऊन उपस्थितांची वाहवा मिळवली. जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी होती. आर्थिक सुरक्षितता असतानाही खेळत्या वयात फासेपारधी समाजातील मुले रस्त्यावर मरत होती. जगण्याची कोणतीही साधने त्यांच्याकडे नव्हती. त्यांची ही विदारक परिस्थिती मतीन भोसले यांच्या मनाला कुठेतरी आतून कुरतडत होती. सरतेशेवटी नोकरी सोडून मुलांना माणूस बनवण्याचा ध्यास त्यांनी घेतला आणि ‘प्रश्नचिन्ह’ शाळेच्या माध्यमातून प्रस्थापितांविरोधात बंड उभारले. मुलांच्या जगण्यासाठी आणि त्यांना शिक्षण देण्यासाठी ‘भीक मांगो आंदोलन’ सुरू करून त्याद्वारे १ रुपया भीक मागणे सुरू केले. सुरुवातीला त्यांच्याकडे १८८ मुले होती. ती सर्व भीक मागू लागली. तेव्हा अनेक आरोप-प्रत्यारोप मंगरूळ चवाळा, नांदगाव येथील लोकांनी केला. कोणी त्यांना चोर ठरवले, कोणी लाकूड तस्कर, कोणी दलाल, तर कोणी काही हिणवले. अमरावतीचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आयुक्त यांनीही अद्वातद्वा बोलून मतीन भोसले यांना नामोहरमा करण्याचा प्रयत्न केला. नोकरी सोडल्याने आईवडील, पत्नी, भाऊ विरोधात गेले, पण त्यांनी व त्यांच्या चारपाच कार्यकर्त्यांनी कधी हिंमत हारली नाही. हळुहळू लोकांची विश्वास संपादन करण्यात ते यशस्वी झाले. त्यांना अनेक हातांची मदत झाली. त्यात जालन्याच्या ‘मैत्र मांदियाळी’ या संस्थेची लाखो रुपयांची मदत झाली. त्यांना मूठभर मागितले तर त्यांनी ट्रकभर धान्य दिल्याचा किस्सा मतीन भोसले यांनी विस्तृतपणे सांगितला. संस्थेने २७ लाख रुपयांची शाळेची इमारत बांधून दिली आहे.

शाळेत ४४७ मुले आहेत. एका मोठय़ा रुमची क्षमता ४० ते ५० मुलांची असताना तेथे ७० मुले ठेवली जातात. मुलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न सुरू असून लवकरच त्यांना पंखे, कुलर, शेतकऱ्यांच्या मोटारी दुरुस्ती व ते बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. काही मुले क्रीडाक्षेत्रात चमकली आहेत. दोन मुली नर्सिगचे प्रशिक्षण करण्यासाठी पुण्याला गेल्या, तर दोन मुलगे नागपुरात पॉलिटेक्निकसाठी आलेले आहेत. शाळेच्या आणखीही गरजा आहेत, पण पूर्वीसारखे जगण्यासाठी एक रुपयाचे ‘भीक मांगो आंदोलन’ सध्या तरी करावे लागत नसल्याचे त्यांनी आनंदाने सांगितले. यावेळी संस्थेचे सचिव मानसिंग पवार उपस्थित होते.

लटारूबाबांचा किस्सा.

मतीन भोसले यांनी गावागावी फिरून फासेपारधी मुलांना एकत्र केले. धुळ्याला गेल्यावर तेथे काही मुलांना त्यांना दारू, खर्रा, मटनाची मागणी केली. ती पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन त्यांना ‘प्रश्नचिन्ह’ शाळेत दाखल करण्यात आले. शाळेत आल्यानंतर दारू, खर्रा, मटन योगेश विसरला. त्याला धावण्याचा आणि सकाळी उठून फिरण्याचा नाद होता. त्याच काळात शाळेत टिव्ही आला. सकाळी उठून वेगवेगळ्या चॅनलवर रामदेव बाबाला पाहून योगेश योगा शिकला, पण नाव माहिती नव्हते. तेव्हा योगा करून दाखवताना रामदेवबाबांचा उल्लेख तो लटारूबाबा करीत असे. आज तोच योगेश योगामध्ये राज्यस्तरावर गेला आहे.

[jwplayer r33reeos]