16 February 2019

News Flash

महाविद्यालयासमोर तरुणीचा विनयभंग

करण ऊर्फ मोनू संजय नंदनवार, असे आरोपीचे नाव आहे. तो एका कारखान्यात कामाला आहे.

( संग्रहीत छायाचित्र )

प्रेमास नकार दिला तर आत्महत्या करेल व तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करेल, अशी धमकी देत प्रियकराने महाविद्यालयासमोरच एका तरुणीचा विनयभंग केला. ही घटना वर्धमाननगरातील व्हीएमव्ही महाविद्यालयासमोर घडली. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

करण ऊर्फ मोनू संजय नंदनवार, असे आरोपीचे नाव आहे. तो एका कारखान्यात कामाला आहे. पीडित मुलगी अकरावीला शिकते. गेल्या काही महिन्यांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. याबाबत मुलीच्या नातेवाईकांना कळले. त्यांनी तिची समजूत घालून करण याच्याशी संबंध तोडण्यास सांगितले.

काही दिवसांपासून ती करणला टाळत होती. मंगळवारी दुपारी करण मुलीच्या कॉलेजजवळ गेला. ती कॉलेजमधून बाहेर येताच तिचा हात पकडला. ‘माझ्या प्रेमाला नकार देऊ नको. तू माझ्यासोबत बोलली नाही तर मी आत्महत्या करेल, त्यासाठी तू जबाबदार असशील ’अशी धमकी दिली. मुलगी घरी गेली. तिने नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला.

नातेवाईकांसह मुलीने लकडगंज पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक आर.एस. गेडाम यांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

First Published on September 6, 2018 3:14 am

Web Title: molestation before college