काँक्रिटीकरणामुळे ग्रामीण भागापेक्षा शहरांच्या तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने भर

रस्ते सिमेंटीकरण -भाग १

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Pune records highest temperature in April in eleven years
पुण्यात अकरा वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाची नोंद; तापमानाचा आलेख कसा चढा राहिला?
paris 2024 olympics olympic torch lit in greece
खराब हवामानातही ग्रीसमध्ये ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित!
wheat India wheat production estimated at 1120 lakh tonnes this year
यंदा गव्हाचे उच्चांकी उत्पादन? तापमान वाढीची झळ कमी; ११२० लाख टन उत्पादनाचा अंदाज

औद्योगिकीकरण आणि त्यातून निर्माण होणारे शहरीकरण ही काळाची गरज असली तरीही पर्यावरण आणि मानवासाठी ती धोक्याची घंटा ठरत आहे. जंगलाचे प्रमाण याआधीच धोक्याच्या पातळीवर कमी झाले आहे. त्यामुळे निसर्गाचे चक्र टिकवण्यासाठी ते अपुरे पडत आहे. त्यातच वाढत असलेले प्रदूषण, शहरीकरण आणि तेथील काँक्रिटीकरण व सिमेंटरचे रस्ते यामुळे ग्रामीण भागापेक्षा शहरांच्या तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने भर पडत आहे. हा प्रकार म्हणजे ‘उष्ण तापमानाची बेटे’(अर्बन हीट आयलंड) असून शहर या प्रभावात आहे. सध्या विकासाच्या दिशेने शहराची वेगाने सुरू असलेली वाटचाल आणि त्यातच संपूर्ण शहरात होणारे रस्त्याचे सिमेंटीकरण यामुळे हा प्रभाव मोठय़ा प्रमाणावर वाढणार असल्याची भीती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

हरितगृह वायू, वाहनांमुळे निर्माण होणारे प्रदूषण आणि आता रस्ते सिमेंटीकरणामुळे तापमानवाढीची भर पडणार आहे. काँक्रिटची घरे रात्री उष्णता बाहेर फेकतात आणि हीच बाब सिमेंट रस्त्यांच्या बाबतसुद्धा लागू पडते. डांबरीकरण असो वा सिमेंटीकरण, भारतात अजूनही जुन्याच पद्धतीने रस्ते तयार केले जातात. शहरातील रस्ते सिमेंटीकरणाचा वेग आणि रस्त्यांची स्थिती पाहता नवीन तंत्रज्ञानाचा आणि प्रामुख्याने तापमानवाढ रोखता येईल, अशा पद्धतीचा वापर यात केला असेल यावर शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सिमेंट रस्त्यांची गती आणि स्थिती शहराच्या तापमानात भर घालत आहेत. सिमेंटमध्ये उष्णता शोषली जात नाही. काँक्रिटमधून प्रकाश परावर्तीत होतो आणि उष्णता निर्माण होते. पर्यायाने उष्णता वाढल्याचे जाणवते. याशिवाय सिमेंट, काँक्रिट उन्हाने गरम होते आणि ते थंड होण्यासाठी प्रचंड वेळ लागतो. त्यामुळे रस्त्यांचे सिमेंटीकरण तापमानात निश्चितच भर घालणारे आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील हा फरक कमी होण्याकरिता सूर्याची किरणे प्रतिबिंबित होऊन बाहेर गेली पाहिजे. मात्र, रस्त्याचे बांधकाम करताना (साधारणपणे ४३ ग्रेडचे सिमेंट) सिमेंट कोणत्या प्रतीचे वापरावे याचे निकष पाळले जातात का, याशिवाय रस्त्याची जाडी यावरही बरेच काही अवलंबून आहे.

 ‘अर्बन हीट आयलंड’

ग्रामीण भागाचे तापमान ४० डिग्री असेल तर शहरी भागाचे तापमान ४२ डिग्रीच्या जवळ असते. अशाप्रकारे उपग्रहीय उष्णता संवेदनशील कॅमेऱ्यातून(थर्मल कॅमेरा) शहरे ही उष्ण तापमानांच्या बेटासारखी दिसतात. हा फरक दोन ते तीन अंश सेल्सिअसच्या आसपास असतो. संवेदनशील कॅमेऱ्यातून टिपलेली प्रतिमा दिवसा आणि रात्री वेगळी असते.

सिमेंटचे रस्ते जोपर्यंत नवीन आहेत, पांढऱ्या रंगाचे आहेत तोपर्यंत सूर्याची किरणे रस्त्यावर आदळून उष्णता बाहेर फेकली जाते. मात्र, हे रस्ते जसजसे जुने होतात आणि त्यांचा रंग गडद होत जातो तसतसे ते उष्णता शोषून घेतात. परिणामी तापमानात वाढ होते. मात्र, त्याचवेळी तापमान वाढीला सिमेंट रस्त्यांच्या बरोबरीने काँक्रिट इमारतींची घनतासुद्धा कारणीभूत ठरते. कारण घरात एसी लावला असताना घर थंड होत असले तरीही घरातील उष्णता बाहेर फेकली जाते.

-राजश्री कोठारकर,  आर्किटेक्ट विभाग, व्हीएनआयटी परमजीत आहुजा,  आर्किटेक्ट

रस्त्याचे क्षेत्रफळ हे अधिक आहे आणि रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात काँक्रिटचा वापर असेल तर तापमान निश्चितच वाढते. नवीन काँक्रिटमध्ये प्रतिबिंबत्व अधिक असते, पण रस्ते एकदा काळे, मळकट झाले की सूर्यकिरणे ओढून घेतात. दिवसभर ते गरम होतात आणि रात्री उष्णता बाहेर फेकतात. रस्ते तयार करताना ते गरम होऊ नये म्हणून वेगवेगळे पर्याय वापरले तर कमी उष्णता फेकतील. त्यामुळे आधी पर्यायांचा विचार व्हायला हवा. कारण उद्या यात गडबड अथवा त्रास होणार असल्याचे लक्षात आले तर सर्व पर्याय बंद झाल्यामुळे काहीच करता येणार नाही. शहरात जर तीन ते चार अंश सेल्सिअसचा फरक जाणवत असेल तर रस्त्यावरून चालताना सात ते आठ अंश सेल्सिअसचा फरक जाणवतो.

-प्रद्युम्न सहस्त्रभोजनी, जलतज्ज्ञ