News Flash

नागपूर : कारागृहातून बाहेर पडताच कुख्यात गुंडाचा खून

खुनाचा बदला घेण्यासाठी हा खून करण्यात आला असावा

(संग्रहित छायाचित्र)

एक कुख्यात गुंड कारागृहाबाहेर येताच त्याचा गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काचीपुरा परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. खुनामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आरोपीही अज्ञात आहेत. पण, खुनाचा बदला घेण्यासाठी हा खून करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलीस वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

हरीश रघुनाथ पटेल (३५) रा. काचीपुरा असे मृताचे नाव आहे. आठ वर्षांपूर्वी हरिषने योगेश पट्?टा नावाच्या एका युवकाचा खून केला होता. त्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहात होता. काही महिन्यांपूर्वीच तो मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर तो काचीपुरा परिसरात फास्टफूडचा हातठेला चालवत होता. दारु पिऊ न शिविगाळ , परिसरात दादागिरी करीत असल्यामुळे त्याच्यापासून वस्तीतील अनेक जण त्रस्त झाले होते. काही दिवसांपूर्वी त्याने एका तरुणाला मारहाणही केली होती.

शनिवारी पहाटे पाच वाजता रघुनाथ पटेल हे झोपेतून उठले आणि मॉर्निग वॉकला जात होते. घरापासून काही अंतरावर जात नाही, तोच त्यांना एक मृतदेह रक्?ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. ते लगेच त्या दिशेने धावले असता मृतदेह त्यांच्या मुलाचाच निघाला. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे शेजारीही जमा झाले. नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. बजाजनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप सापडले नसून खुनाचा बदला घेण्यासाठीच त्याचा खून करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2020 6:08 pm

Web Title: nagpur crime muder police criminal nck 90
Next Stories
1 वाघाच्या स्थलांतरित मार्गाकडे दुर्लक्ष केल्याने संघर्ष
2 राज्य सरकारचा रिमोट ‘सिल्व्हर ओक’वर, पण बॅटरी दिल्लीत – फडणवीस
3 Video : क्रीडा महोत्सवात फडणवीस बनले गोलंदाज, हार्दिक पांड्याला चकवलं
Just Now!
X