News Flash

वायूवेगाने प्राणवायूची व्यवस्था!

गडकरी, राऊत, फडणवीसांचे प्रयत्न फळाला; करोनाशी लढणाऱ्या नागपूरकरांना दिलासा

(संग्रहित छायाचित्र)

गडकरी, राऊत, फडणवीसांचे प्रयत्न फळाला; करोनाशी लढणाऱ्या नागपूरकरांना दिलासा

नागपूर : करोनाशी लढताना प्राणवायूसाठी झुंजणाऱ्या नागपूरकरांना सत्तापक्ष व विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. देशभरातून वायूवेगाने प्राणवायू नागपुरात दाखल होत असून शहरातील प्राणवायूचा तुटवडा बऱ्याचअंशी कमी झाला आहे.

पालकमंत्री नितीन राऊत यांच्या सूचनेनुसार व जिल्हा प्रशासनाच्यावतीने  नागपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यांसाठी ओडिशातून प्राणवायूची आयात करण्यात येत आहे. बुधवारी वायुदलाच्या विशेष विमानाने नागपूर येथून टँकर भूवनेश्वरकडे रवाना झाले आहेत.

याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने सूक्ष्म, मध्यम उद्योग विभागाने पुढाकार घेतला असून १० कोटी रुपयांचा प्राणवायू प्रकल्प उभारून त्याद्वारे खासगी इस्पितळांना त्याचा पुरवठा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून शहरात गुरुवारी पुन्हा प्राणवायूचे टँकर शहरात पोहचले.

विदर्भासाठी ओडिशातून प्राणवायू

नागपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यांसाठी ओडिशातून प्राणवायूची आयात करण्यात येत आहे. बुधवारी वायुदलाच्या विशेष विमानाने नागपूर येथून टँकर भूवनेश्वरकडे रवाना झाले आहेत. परत येताना ते रेल्वेने येणार असून त्यासाठी २० तास लागणार आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिलाई येथून ११० मॅट्रिक टन ऑक्सिजन नागपूरला नियमित मिळते. मात्र वाढती मागणी लक्षात घेता एकशे दहा मेट्रिक टन अतिरिक्त प्राणवायू पुढील वीस ते पंचवीस तासानंतर भूवनेश्वर (ओडिशा) नजीकच्या अंगुळ येथील पोलाद प्रकल्पातून  नागपूरला मिळणार आहे. त्यामुळे विदर्भातील  काही जिल्ह्यांची प्राणवायूची गरज भागवता येईल. नागपूरला १ मे रोजी ९३ मेट्रिक टन, दोन मे रोजी २२० मेट्रिक टन, तीन मे रोजी १११ मेट्रिक टन, ४ मे रोजी ६० मेट्रिक टन तर पाच मे रोजी ११८ मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा झाला. यातून शहर व ग्रामीण भागातील रुग्णालयांना पुरवठा केला जात आहे. मात्र हा साठा कमी असल्याने केंद्राच्या वायुदलाच्या विशेष विमानाची मदत जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. त्यासाठी आवश्यक असणारे टँकर वायुदलाच्या महाकाय विमानाने रवाना झाले. येताना सर्व टँकर रेल्वेने पोहोचणार आहेत. दरम्यान, करोनाच्या संसर्ग काळामध्ये मोठय़ा प्रमाणात निधीची शासनाला आवश्यकता आहे. स्थानिक स्तरावरही मोठय़ा प्रमाणात यासाठी निधी उभारला जात असून नागपूर जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक उद्योजक-संस्थांना सामाजिक दायित्व निधीसाठी मागणी करण्यात आली आहे.

‘एमएसएमई’ १० कोटींचा प्रकल्प उभारणार

करोना महामारीच्या काळात निर्माण झालेला प्राणवायूचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने केंद्रीय सूक्ष्म, मध्यम उद्योग विभागाने पुढाकार घेतला असून १० कोटी रुपयांचा प्राणवायू प्रकल्प उभारून त्याद्वारे खासगी इस्पितळांना त्याचा पुरवठा करण्याचा मानस  आहे.बुधवारी एमएसएमईचे अधिकारी व विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी एमएसएमईचे संचालक डॉ. पी.एम. पार्लेवार उपस्थित होते. विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनशी १०० हून अधिक खासगी रुग्णालये जुळली आहेत. त्यांना प्राणवायूचा पुरवठा करण्यासाठी बैठकीत चर्चा झाली. एमएसएमईच्या क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेतर्गत प्राणवायू प्रकल्प (कॉमन फॅसीलिटी सेंटर) उभारण्यावर चर्चा करण्यात आली   सुमारे १७००  सिलेंडरचा हा प्रकल्प  असेल. त्यासाठी १० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.यासाठी १० ते ३० टक्के  खर्च  खाजगी हॉस्पिटल देण्यास तयार आहेत आणि उर्वरित ७०  टक्के  रक्कम केंद्र सरकार देणार आहे. हा पथदर्शी प्रकल्प अस्तित्वात आल्यास देशाच्या इतर भागातही  त्याचे अनुकरण केले जाऊ शकते. योजनेचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर)  तातडीने मंत्रालयाकडे  सादर केला जाईल. या प्रकल्पातून खासगी रुग्णालयांना प्राणवायू पुरवठा केला जाईल.  नागपुरात  ‘ऑक्सिजन बँक’ म्हणून हा प्रकल्प काम करेल. त्यासाठी जागेचा  शोध घेणे सुरू आहे   सुमारे १७००  सिलेंडरचा हा प्रकल्प  असेल. त्यासाठी १० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.यासाठी १० ते ३० टक्के  खर्च  खाजगी हॉस्पिटल देण्यास तयार आहेत आणि उर्वरित ७०  टक्के  रक्कम केंद्र सरकार देणार आहे. हा पथदर्शी प्रकल्प अस्तित्वात आल्यास देशाच्या इतर भागातही  त्याचे अनुकरण केले जाऊ शकते. योजनेचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर)  तातडीने मंत्रालयाकडे  सादर केला जाईल. या प्रकल्पातून खासगी रुग्णालयांना प्राणवायू पुरवठा केला जाईल.  नागपुरात  ‘ऑक्सिजन बँक’ म्हणून हा प्रकल्प काम करेल. त्यासाठी जागेचा  शोध घेणे सुरू आहे.

दोन टँकर प्राणवायू नागपुरात पोहोचले

शहरात गेल्या काही दिवसांपासून करोना बाधीत रुग्णांची वाढती संख्या बघता प्राणवायूची कमतरता निर्माण झाली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून शहरात गुरुवारी पुन्हा प्राणवायूचे टँकर शहरात पोहचले आहे. यापूर्वी ३८ मेट्रिक टन प्राणवायू आणण्यात आले होते आणि आता पुन्हा दोन टँकर प्राणवायूचे आल्यामुळे आतापर्यत निको ग्रुपच्या मदतीने १३५ मेट्रिक टन प्राणवायू शहरात मिळाले आहे त्यामुळे नागरिकांना मोठय़ा प्रमाणात यामुळे दिलासा मिळाला. बुधवारी निको ग्रुपकडून  दोन टँकर शहरात शहरात मिळाले आहे. यापूर्वी नागपूरसाठी ३८ मेट्रिक टन प्राणवायू घेऊन दोन टँकर आज पंधरा दिवसापूर्वी आले होते. त्यातून शासकीय आणि खाजगी रुग्णालये मिळून चार ठिकाणी ४१८० जम्बो सिलेंडर्स भरण्यात आले होते आणि  सुमारे  तीन हजाराहून अधिक प्राणवायू खाटांची गरज भागविली गेली होती. आताही पाच ते सहा हजार प्राणवायू खाटांना प्राणवायू उपलब्ध होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. जयस्वाल निकोचे अध्यक्ष बसंतलाल शॉ आणि सहप्रबंध संचालक रमेश जयसवाल यांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत. हे दोघेही मूळचे नागपूरकर असल्याने त्यांनी पुढाकार घेत टँकर नागपूरला देण्याच्या  फडणवीस यांनी केलेल्या विनंतीला मान दिला होता. फडणवीस यांनी स्वत: नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊ  न जिल्हाधिकारी आणि त्यांचे बोलणे करून दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2021 2:11 am

Web Title: oxygen enters nagpur from all over the country after efforts by gadkari raut and fadnavis zws 70
Next Stories
1 सलग सहाव्या दिवशी नवीन रुग्णांहून करोनामुक्त अधिक!
2 विद्यार्थिनीने चक्क अतिदक्षता विभागातून दिली परीक्षा!
3 लोकजागर : नफ्याची दुसरी ‘लाट’! 
Just Now!
X