नागपूर : भांडेवाडी रेल्वेस्थानक परिसरात पोपटांची विक्री करणाऱ्याला वाईल्डलाईफ ऑर्गनायझेशन रेस्क्यू रिअ‍ॅबिलिटेशन ऑफ क्रिएचर्सने पकडले व या प्रकरणाची माहिती वनखात्याला दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या परिसरात एक व्यक्ती सायकलवरून पोपट विकत असताना स्थानिक युवक जुबेर शेख यांनी ही माहिती संस्थेचे स्वप्निल बोधाने याला दिली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पोपट विकणाऱ्या व्यक्तीसोबत तीन हजार रुपयात पोपट खरेदीचा सौदा केला. दरम्यान, स्वप्निल बोधाने व सतीश जांगडे तिथे पोहोचले. त्यांनी पोपट विक्रेत्याला ताकीद देऊन सोडून दिले. त्याच्याकडून पिंजऱ्यासह नऊ पोपट जप्त करून वनपरिक्षेत्र अधिकारी गंगावणे यांना कळवले. जप्त केलेले पोपट सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये पाठवण्यात आले. केंद्राचे वन्यजीव चिकित्सक अंकुश दुबे यांनी पोपटांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली. या पोपटांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पोपट विक्रेत्याला पकडण्यासठी बादल जांगडे, सूरज सूर्यवंशी, तौसिफ खान आदींनी सहकार्य केले. वन्यजीव कायद्याअंतर्गत पोपट अनुसूचीत येतो. पोपट घरी पाळणाऱ्या व्यक्तींवर कायद्याने २५ हजार रुपये दंड आकारता येतो. तरीही अनेक सुशिक्षित लोकांकडे पोपट पाळण्यात येतो. त्यामुळे शहरात अनेक भागात पोपट विकले जातात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parrot sellers arrested by nagpur police
First published on: 22-09-2018 at 04:30 IST