मध्य भारतातील सायकल कथेत ‘तेजस्वी अध्याय’

‘सुपर रांदेन्युअर्स’ होणे हे प्रत्येक सायकलपटूचे स्वप्न असते. यातील एकाने हा किताब दोनदा पटकावला आहे, तर दुसरा हा किताब दुसऱ्यांदा पटकावण्याच्या तयारीत आहे. हे दोघेही केवळ उत्साही सायकलपटू नाहीत, तर त्यांच्यासमोर ध्येय आहे. मध्य भारतातील सायकल कथा अतिशय चांगले वळण घेऊन विकसित होत असताना, त्यात आता आणखी एक नवा तेजस्वी अध्याय या दोघांच्या कामगिरीच्या निमित्ताने जोडला गेला आहे. विकास पात्रा आणि अनिरुद्ध रईंच या नागपुरातील दोन ‘सुपर रांदेन्युअर्स’ने पहिल्यांदा १२०० किलोमीटरची ‘ब्रेव्हेट’ पूर्ण करून नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Over 100 Private Hospitals in Pune Operate Without Renewed Licenses
धक्कादायक! पुण्यात शंभरहून अधिक रुग्णालये विनापरवाना
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच

दिल्ली शहरातील जड वाहतूक, राजस्थानमधील वाळू आणि दरम्यान विरुद्ध दिशेने वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा सामना करीत दिलेल्या वेळेत सायकलीने अंतर तुडवणे सोपे नाही. मात्र, ही कामगिरी या दोघांनीही लिलया पार पाडली. दिल्ली-उदयपूर-दिल्ली हे अंतर ९० तासांत पूर्ण करावयाचे असताना नऊ तासांचा वेळ राखून अवघ्या ८१ तासांत त्यांनी पार केले. दिल्लीच्या रांदेन्युअर्सने आयोजित केलेली ‘ब्रेव्हेट’ शनिवार, २५ फेब्रुवारीला पहाटे ५ वाजता सुरू झाली आणि मंगळवारी संपली. त्यांचा खोगीर वेळ हा ४७ तास आणि ३७ मिनिटांचा, तर त्यांचा सरासरी वेग २५.४ इतका होता. चारपदरी रस्ता आणि २४०० मीटर उंचीच्या मार्गावरील १२०० किलोमीटरच्या ‘ब्रेव्हेट’करिता १३ सायकलपटूंनी नोदणी केली होती. त्यातील दोन बंगळुरू, दोन हैदराबाद, दोन नागपूर आणि इतर दिल्लीचे सायकलपटू होते. यातील दोघांनी आधीच माघार घेतली तर एकाने मध्येच सोडले. उर्वरित दहा जणांनी दिलेल्या वेळेत अंतर पूर्ण केले. यात एका महिलेचासुद्धा समावेश होता. एका सायकलपटूने ८० तासात आणि त्यानंतर विकास पात्रा व अनिरुद्ध रईंच यांनी ८१ तासांत अंतर पूर्ण केले. विकास पात्रा हे आयटी कंपनीत असून अनिरुद्ध रईंच यांचे ‘एन्सायक्लोपिडीया’हे आंतरराष्ट्रीय सायकलींचे दुकान आहे. हे दोघेही त्याच्या दैनंदिन कामासाठी प्रामुख्याने सायकलचाच वापर करतात.

ब्रेव्हेटम्हणजे काय?

‘ब्रेव्हेट’ म्हणजे सायकलीने लांब पल्ल्याचे अंतर गाठणे असून ऑडक्स पॅरिसशी संलग्न असलेल्या ऑडक्स इंडियाच्यावतीने ती आयोजित केली जाते. याअंतर्गत कमीतकमी २०० किलोमीटरचे अंतर १३.५ तासात आणि अधिकाधिक ३०० किलोमीटरचे अंतर २० तासात, ४०० किलोमीटरचे अंतर २७ तासात, ६०० किलोमीटरचे अंतर ४० तासात, १००० किलोमीटरचे अंतर ७५ तासात आणि १२०० किलोमीटरचे अंतर ९० तासात पूर्ण करावे लागते.

सुपर रांदेन्युअर्सम्हणजे काय?

एका कॅलेंडर वर्षांत २००, ३००, ४०० आणि ६०० किलोमीटरचे अंतर वेळेत पूर्ण करणाऱ्या सायकलपटूला ‘सुपर रांदेन्युअर्स’चा किताब दिला जातो. अनिरुद्ध रईंच यांनी मागील सलग दोन वर्ष ‘सुपर रांदेन्युअर्स’चा किताब पटकावला, तर विकास पात्रा यांनी एकदा हा किताब पटकावला असून दुसऱ्यांदा तो पटकावण्याच्या तयारीत आहेत.

सायकलपटूंसाठी सर्वात मोठे आव्हान हवेचे असते. रस्ता मोकळा असतो तेव्हा विरुद्ध दिशेने आणि वेगाने हवेचा झोत आल्याने सायकलीवरील संतुलन बिघडू शकते. दिल्ली शहरात मोठय़ा आकाराच्या ट्रकमध्ये एकमेकांना मागे टाकण्याची जणू स्पर्धा सुरू होती आणि त्यातून मार्ग काढताना एकवेळ अक्षरश: एक फुटाजवळून ट्रक गेला. राजस्थानमध्ये प्रवेश केल्यानंतर रस्त्याच्या कडेला मोठय़ा प्रमाणावर वाळू होती. सायकलची चाके पातळ असल्याने बाजूने वाहन गेल्यास रस्त्याच्या कडेला उतरणेही शक्य नव्हते. मात्र, हे आव्हान आम्ही यशस्वीपणे पेलले.

विकास पात्रा, अनिरुद्ध रईंच