News Flash

ऑटोचालकांकडून ऑटोचालकाचा खून; तीन जणांना अटक

ऑटो चालवण्याच्या वादातून तीन ऑटोचालकांनी एका ऑटोचालकाचा खून केला.

प्रतिकात्मक छायाचित्र

ऑटो चालवण्याच्या वादातून तीन ऑटोचालकांनी एका ऑटोचालकाचा खून केला. ही घटना सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनगाव येथे उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी तीनजणांना अटक केली आहे.

मनीष ऊर्फ चिंटय़ा भीमराव वासनिक (३१) रा. रामबाग, दीपेश दीपक तायडे (२७) रा. बैद्यनाथ चौक, रामबाग आणि पवन नीलकंठ पाटील (३५) रा. रामबाग अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वासुदेव नामदेवराव डफ (३६) असे मृत इसमाचे नाव आहे. आरोपी आणि मृत हे गणेशपेठ बसस्टॅण्ड परिसरात ऑटो चालवायचे. ऑटो चालवण्यावरून त्यांच्याद वाद निर्माण झाले. या वादातून त्यांनी ८ नोव्हेंबरला वासुदेवला दारू पिण्याकरिता सोबत घेऊन गेले. त्याला दारू पाजून शिवनगाव परिसरातील कलकुही येथे घेऊन गेले आणि त्याच्या डोक्यावर दगडाने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेहाजवळील सर्व दस्तावेज घेऊन पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता मृताची ओळख पटण्यासारखे काहीच नव्हते. केवळ त्याच्या मनगटावर इंग्रजी ‘आय लव्ह यू’ व एक दिलाच्या आकाराचे गोंदण होते.

त्या गोंदनात वासदुवे व मंगला अशी नावे कोरली होती. त्या आधारावर पोलिसांनी तपास करून मृतदेहाची ओळख पटवली व आरोपींना अटक केली. आरोपींनी गुन्हा कबूल केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 1:01 am

Web Title: three people arrested in auto driver murder case in nagpur
Next Stories
1 अंतिम प्रवासाचा मागर्ही असुविधांमुळे खडतर
2 सुगम संगीताच्या आड अवैध ‘डान्सबार’
3 पालकांच्या अनैतिक संबधांना कंटाळून तरुणीचा आत्महत्त्येचा प्रयत्न
Just Now!
X