केंद्रीय कृषी राज्यमंत्री डॉ. बलयान यांची घोषणा

पशुवैद्यक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना ७ हजार रुपये आंतरवासिता मानधन (इन्टर्नशीप अलाउन्स) दिले जाते. मात्र, यापुढे ते १५ हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी राज्यमंत्री डॉ. संजीवकुमार बलयान यांनी केली.

नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पशुवैद्यक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची गेल्या अनेक वर्षांपासून आंतरवासिता भत्ता वाढवून देण्याची मागणी होती. ही मानधनाची रक्कम ५० टक्के आयसीआर आणि ५० टक्के राज्य सरकार देणार आहे. याचबरोबर देशभरातील पशुपालकांसाठी सिरम ह्य़ुमन टेक्नॉलॉजी आणि वर्षांतून एकदा लसीकरण या योजनाही लवकरच सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पशुवैद्यकीय महाविद्यालयांच्या विकासासाठी भारतीय पशुवैद्यकीय परिषदेने विविध प्रकल्पासंदर्भात ३६ कोटी रुपयांची मागणी केली आहे. केंद्र सरकार पशुवैद्यकांसाठी आणि जनावरांसाठी पैसा कमी पडू देणार नाही. ज्या योजना अंमलात आणल्या जातील त्या पूर्ण केल्या जातील. पशुवैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढविण्याच्या मागणीचा विचार करण्यात आला असून महाराष्ट्रात ५ पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे आणि लवकरच दोन नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती केली जाणार असल्याचेही बलयान यांनी सांगितले. सध्याच्या महाविद्यालयांचा विकास करून तेथे अत्याधुनिक सोयी-सुविधांसह विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण कसे देण्याच्या दृष्टीने केंद्राच्या वतीने निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात डेअरी विकासासाठी ८५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पशुधनासाठी निधीची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. राज्यातील अनेक भागात दुष्काळ परिस्थिती असताना त्यावर मात करण्यासाठी आणि शे