लोकसत्ता टीम

नागपूर : ज्या स्कूलबसमधून मुलगी शाळेत जात होती, त्याच स्कूलबसवरील चालकाचा मित्र असलेल्या युवकाने दहाविच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला रात्रीच्या सुमारास जंगलात नेऊन बलात्कार केला. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. श्याम उर्फ बिट्टू प्रशांत बेलखोडे (२४) रा. जलारामनगर, खरबी रोड, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

पीडित १५ वर्षीय मुलगी ही दहावीची विद्यार्थिनी आहे. बिट्टू हा ड्रायव्हरचे काम करतो. बिट्टूचा एक मित्र स्कूल बस चालवतो. त्याच्या बसमधून पीडित मुलगी शाळेत येणे-जाणे करीत होती. बिट्टू हा नेहमी स्कूलबसवर मित्रासोबत येत होता. या दरम्यान तिची बिट्टूशी ओळख झाली. बिट्टू नेहमी तिच्याशी गोड-गोड बोलत होता. दरम्यान, तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. १९ जानेवारीला बिट्टूने मुलीला पाणीपुरी खाण्यासाठी हसनबाग परिसरात बोलावले.

आणखी वाचा-नागपूर : आईच्या प्रियकराची मुलाने केली धुलाई

रात्री ८ वाजताच्या सुमारास ती त्याला भेटण्यासाठी हसनबाग परिसरात गेली. तेथून बिट्टू तिला दुचाकीवर बसवून वाठोडा कुलर कंपनीजवळील जंगलात निर्जनस्थळावर घेऊन गेला. तेथे त्याने तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवले. याबाबत वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरामुळे मुलगी घाबरलेली होती. तिचा स्वभाव बदलला होता. ती कोणाशीच बोलत नव्हती. मुलीची ही अवस्था पाहून आईने तिला विश्वासात घेत विचारपूस केली. तिने बिट्टूने जबरीने लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. वाठोडा पोलिसात घटनेची तक्रार करण्यात आली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून बिट्टूला अटक केली.