२४ तासांत ६ मृत्यू; ३७९ नवीन रुग्ण

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ६ करोनाबाधितांचा मृत्यू झाला, तर ३७९ नवीन रुग्णांची भर पडली.  सलग चार दिवस जिल्ह्य़ात करोनामुक्तांहून नवीन बाधितांची संख्या अधिक होती. परंतु सोमवारी नवीन रुग्णांहून करोनामुक्त अधिक आढळले.

नवीन रुग्णांमध्ये शहरातील ३०८, ग्रामीण ६८, जिल्ह्य़ाबाहेरील ३ अशा एकूण ३७९ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या ९९ हजार २९६, ग्रामीण २५ हजार २४०, जिल्ह्य़ाबाहेरील ७६९ अशी एकूण १ लाख २५ हजार ३३२ रुग्णांवर पोहचली आहे. दिवसभरात शहरात २, ग्रामीणला १, जिल्ह्य़ाबाहेरील ३ असे एकूण ६ रुग्णांचे मृत्यू झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या २ हजार ६५२, ग्रामीण ६९९, जिल्ह्य़ाबाहेरील ६१४ अशी एकूण ३ हजार ९६५ रुग्णांवर पोहचली आहे.  दिवसभरात शहरात ३२४, ग्रामीणला ७० असे एकूण ३९४ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ९३ हजार ७२८, ग्रामीण २३ हजार ६२३ अशी एकूण १ लाख १७ हजार ३५१ वर पोहचली आहे. दरम्यान,  शहरात २ हजार ९१६, ग्रामीणला १ हजार १०० असे एकूण ४ हजार १६ सक्रिय  रुग्ण आहेत. त्यातील २ हजार ६७० रुग्णांवर गृह विलगीकरणात तर  ९६७ गंभीर  रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

इंग्लंडहून परतलेल्या तिघांना नवीन करोना नाही

इंग्लंडहून परतलेल्यांपैकी तिघांमध्ये नवीन करोना विषाणू नसल्याचे राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतील (एनआयव्ही) अहवालातून स्पष्ट झाले आहे. इतर पाच रुग्णांचे अहवाल अद्यापही अप्राप्त आहेत. या तिघांचा दुसरा अहवाल  नकारात्मक आल्याने त्यांना सुट्टी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  इंग्लंडहून नागपुरात परतलेल्या ८ व्यक्तींची चाचणी केली असता त्यांना करोना असल्याचे पुढे आल्याने त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

विदर्भातील मृत्यू

(४ जानेवारी)

जिल्हा                   मृत्यू

नागपूर                   ०६

वर्धा                        ०१

चंद्रपूर                    ०१

गडचिरोली               ०१

यवतमाळ                 ०१

अमरावती                 ००

अकोला                   ००

बुलढाणा                  ००

वाशीम                     ००

गोंदिया                     ००

भंडारा                      ०१

एकूण                      ११