अकोला : कुलरमधील विजेचा धक्का लागल्याने सात वर्षीय चिमुकलीचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना शहरातील शिवसेना वसाहतीमध्ये रविवारी सायंकाळी घडली. शिवसेना वसाहतीमधील रहिवासी माजी नगरसेवक अमोल गोगे यांची सात वर्षीय मुलगी युक्ती घरातील कुलरजवळ खेळत होती. कुलरला असलेल्या बटनांची एक वायर कटल्याने त्यामधील विजेचा प्रवाह पसरला होता. दरम्यान, युक्तीचा हात कुलरला लागला. यामुळे तिला विजेचा जबर धक्का बसला.

हेही वाचा : नागपूर सुधार प्रन्यासच्या जलतरण तलावापुढील पदपथ झाले वाहनतळ; वाहतूक शाखेचे दुर्लक्ष, वाहनकोंडीने नागरिक त्रस्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. युक्तीचे आई-वडिल व कुटुंबीय घरातच होते. मात्र, त्यांच्या लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेली होती. कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. गोगे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.