KL Rahul Video : लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात रविवारी आयपीएल २०२४ मधील ५४ वा सामना खेळला गेला. या सामन्यात कोलकाताने लखनऊवर ९८ धावांनी मोठा विजय मिळवत गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले. प्रथम फलंदाजी करताना केकेआर संघाने ६ बाद २३५ धावा केल्या होत्या. मात्र, प्रत्युत्तरात एलएसजीचा संघ १६.१ षटकांत १३७ धावांवर गारद झाला. दरम्यान या सामन्यात केएल राहुलने एक अप्रतिम झेल घेतला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते कौतुक करत आहेत.

वास्तविक, केएल राहुलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार आणि स्टार यष्टीरक्षक केएल राहुलने रविवारी झालेल्या आयपीएल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला सुपरमॅन शैली झेलबाद केले, ज्यामुळे श्रेयस अय्यर तंबूत परतावे लागले. केएल राहुलने अय्यरचा झेल घेण्यासाठी दाखवलेली चपळता पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

t20 world cup 2024 usa vs india match prediction
भारतीय फलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष; आज यजमान अमेरिकेचे आव्हान; बुमरा, हार्दिककडून अपेक्षा
IND vs PAK Match Mohammed Siraj aggressive throw hits Rizwan Hand
VIDEO : ‘भाई ये क्या कर दिया…’, सिराजने मुद्दाम रिझवानला चेंडू मारला? चाहत्यांच्या प्रतिक्रिया व्हायरल
Pat Cummins triggers Virat Kohli fans as 'jobless' video surfaces online: 'Say anything about him and watch out'
VIDEO : विराट कोहलीच्या चाहत्यांवर पॅट कमिन्स संतापला; म्हणाला, “सर्वच्या सर्व चाहते…”
Gautam Gambhir reaction to KKR title
“…उसका रथ आज भी श्रीकृष्ण ही चलाते हैं”, KKRला चॅम्पियन बनवल्यानंतर गौतम गंभीरची प्रतिक्रिया व्हायरल
MS Dhoni avoided shaking hands with RCB players after defeat
IPL 2024 : आरसीबीच्या खेळाडूंशी हस्तांदोलन टाळल्यानंतर धोनीचा शोध घेतानाचा विराट कोहलीचा VIDEO व्हायरल
Yash Dayal's video call to his mother after the win
IPL 2024 : ‘आता तुला कसं वाटतयं आई?’, आरसीबीला विजय मिळवून दिल्यानंतर यश दयाल व्हिडीओ कॉलवर भावूक
Virat Kohli and Anushka Sharma emotional
RCB vs CSK : आरसीबी प्लेऑफ्समध्ये पोहोचल्यानंतर विराट-अनुष्का भावूक, डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचा VIDEO व्हायरल
Gautam Gambhir statement on Ben Stokes
‘बेन स्टोक्स दिल्लीतील लोकांमधील चुकीच्या कारणामुळे लोकप्रिय’, माजी खेळाडू गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य

त्याचे असे झाले की कोलकात नाईट रायडर्सच्या डावातील २० व्या षटकात लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज यश ठाकूर गोलंदाजी करायला आला होता. या षटकात श्रेयस अय्यरने यश ठाकूरच्या तिसऱ्या चेंडूवर पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या ग्लोव्हजला लागला आणि विकेटच्या मागे गेला. यानंतर केएल राहुलने विकेटच्या मागे आलेल्या चेंडूवर सुपरमॅनप्रमाणे हवेत झेपावत शानदार झेल घेतला. केएल राहुलने सुपरमॅनच्या शैलीत एका हाताने आश्चर्यकारक झेल घेतला. केएल राहुलने डावीकडे डायव्हिंग करून चेंडू पकडला. श्रेयस अय्यर १५ चेंडूत २३ धावा करून बाद झाला. केएल राहुलचा झेल पाहून गोलंदाजी करणाऱ्या यश ठाकूरनेही त्याच्यासमोर हात जोडले. केएल राहुलच्या या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – CSK vs PBKS : ‘…तर एमएस धोनीने खेळू नये,’ हरभजन सिंगचे माहीबाबत मोठं वक्तव्य

कोलकाताने लखनऊचा केला पराभव –

या सामन्यात सुनील नरेनच्या अर्धशतक आणि शानदार गोलंदाजीच्या जोरावर केकेआरने यजमान एलएसजीचा ९८ धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याची योजना लखनऊसाठी कामी आली नाही. विशेष म्हणजे केकेआर एकना स्टेडियमवर २०० धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला संघ ठरला आहे. सुनील नरेनने पुन्हा एकदा आपली क्षमता दाखवत ३८ चेंडूंत ७ षटकार आणि ६ चौकारांसह ८१ धावा केल्या. यासह केकेआरने सहा विकेट्सवर २३५ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यश मिळवले. या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊच्या फलंदाजांना सुरुवातीपासूनच वेगवान खेळी करावी लागली, पण यजमानांना मोठे फटके मारण्यात अपयशी ठरले. ज्यामुळे लखनऊचा संघ १६.१ षटकांत १३७ धावांत गारद झाला.