scorecardresearch

बुलढाणा: वेदनांची तमा न बाळगता कॅन्सरग्रस्त रुग्णाने बजावला मतदानाचा हक्क

जिल्ह्यात जवळपास दोन ते अडीच लाख पदवीधर असताना केवळ ३८ हजार मतदारांनीच नोंदणी केली आहे.

prashant kulkarni
प्रशांत कुळकर्णी

लाखोंच्या संख्येतील पदविधरांची नोंदणी संदर्भात आणि मतदार असताना मतदानासाठी असलेली निष्क्रियता या निराशाजनक पार्श्वभूमीवर येथील कॅन्सरग्रस्त रुग्णाने वेदनांची तमा न बाळगता मतदानाचा हक्क बजावला.प्रशांत कुळकर्णी असे या मतदाराचे नाव आहे. बुलढाणा शहरातील रहिवासी असलेल्या कुलकर्णी यांनी स्थानिय शिवाजी हायस्कुल मधील मतदान केंद्रावर पहिल्याच टप्प्यात म्हणजे सकाळी १० वाजताच्या आसपास मतदान केले. मतदान केल्यावर प्रसिद्धी माध्यमासोबत बोलताना आपली व्यथा व्यक्त करतानाच जिल्ह्यातील मतदारांना बहुसंख्येने मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा >>>कुष्ठरोग जनजागृतीसाठी धावले नागपूरकर

जिल्ह्यात जवळपास दोन ते अडीच लाख पदवीधर असताना केवळ ३८ हजार मतदारांनीच नोंदणी केली आहे. नोंदणी असलेल्या मतदारांची मतदानासाठी असलेली उदासीनता देखील आज दिसून आली. या पार्श्वभूमीवर कॅन्सरग्रस्त रुग्णाने आपल्या वेदना विसरून मतदानाचा हक्क बजावून इतर मतदारांच्या डोळ्यात अंजन घातल्याचे चित्र आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 18:00 IST