राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरासमोर बॉम्ब ठेवला असून लवकरच स्फोट होणार आहे, असा फोन नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला आला. त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे सर्वच अधिकाऱ्यांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. त्याला मध्यरात्रीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी पोलीस करीत आहेत.

हेही वाचा >>>गडचिरोली: भामरागड तालुक्यातील दुचाकी रुग्णवाहिकेचा फसवा प्रयोग; प्रसिद्धीसाठी अधिकाऱ्यांची चमकोगिरी

chandrapur lok sabha marathi news, devendra fadnavis chandrapur lok sabha marathi news
मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा ‘मेकओव्हर’ करतील; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत
tejashwi yadav on modi guarantee
“पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी ही चीनच्या वस्तूंसारखी…”, तेजस्वी यादव यांचा भाजपाला टोला
Sunita Kejriwal is likely to become Delhi Chief Minister
सुनीता केजरीवाल यांच्याक़डे मुख्यमंत्रीपद येण्याची शक्यता
vina vijayan ed case
मुख्यमंत्र्यांच्या मुलीवर ईडीची कारवाई; केरळमध्ये काय घडतंय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरासमोर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन सोमवारी रात्री नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला आला. पोलीस दलात एकच खळबळ उडाली. यानंतर नागपूर पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाने रात्री १२ वाजताच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांच्या घराची तपासणी केली. तसेच पोलीस आयुक्तांनी लगेच अधिकाऱ्यांना सूचना देऊन आरोपीचा शोध घेण्यास सांगितले. नागपूर पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. हा ‘फेक कॉल’ असल्याचे तपासात समोर आले आहे. हा खोडसाळपणा करणाऱ्याची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. सध्याच्या स्थितीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी कोणतीही सुरक्षा वाढवण्यात आलेली नाही.

हेही वाचा >>>नागपूर: मूत्रपिंड प्रत्यारोपणाला अडचणींचा थांबा!

सूत्रांच्या माहितीनुसार, फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ‌व्यक्ती दुखावलेला होता. त्याने केवळ दिशाभूल करण्याच्या उद्देशाने हा फोन केला होता. त्याच्या कॉलमध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे बॉम्ब किंवा कोणतीही वस्तू तिथे आढळलेले नाहीत. तसेच पुढील कारवाई केली जात आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.