सर्वत्र वाईट बातम्यांचा सुकाळ झाला असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रायपूर ग्रामपंचायतीने मात्र एक सकारात्मक पाऊल उचलून इतरही ग्रामपंचायतींनी त्यांचा आदर्श घ्यावा असा उपक्रम गणतंत्र दिनी केला. नियमित कर भरणाऱ्या एका महिलेच्या हस्ते ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहण करून तिचा सन्मान करण्यात आला.

रायपूर ग्रामपंचायतीच्या दुकानांमध्ये कांता रमेश नगराळे या व्यवसाय करतात. त्या नियमितिपणे दुकानाचे भाडे आणि कर ग्रामपंचायतीमध्ये भरतात. इतरही व्यावसायिकांनी कांताबाई प्रमाणे कर भरावे व ग्रामपंचायतीच्या महसुलात भर घालावी हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी २६ जानेवारी रोजी गणतंत्र दिनी सरपंच उमेश आंबटकर यांनी कांता नगराळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार गुरुवारी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्याचे उमेश आंबटकर यांनी सांगितले.

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
sangli municipal corporation marathi news
सांगली: महिलेवर अत्याचार करणाऱ्या पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

हेही वाचा – चंद्रपूर: मातोश्री वृद्धाश्रम सेवाभाव मुळेच उभे; वृद्धाश्रमाला ५० लक्ष रुपये मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू- उपमुख्यमंत्री फडणवीस

हेही वाचा – वाशीम :राष्ट्रध्वजाचा अवमान, जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहण वादाच्या भोवऱ्यात

रायपूर ग्रामपंचायतची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार ८ हजार आहे. सरपंच थेट जनतेतून निवडून आला आहे. ग्रामपंचायतची सदस्यसंख्या १७ आहे. ग्राम पंचायतीच्या मालकीचे गावात ६३ दुकान गाळे आहेत. त्यावेळी दुकान गाळ्याचे भाडे ३०० रुपये ठरविण्यात आले होते. आताही तेच भाडे आकारण्यात येत आहे. या गाळेधारकांपैकी केवळ तीन व्यावसायिकांनी नियमित भाडे व कराचा भरणा केला आहे. इतर गाळे धारकांकडे ८ लाख ५० हजार रुपये थकित आहेत. गावात मालमत्ता कर व पाणी कराचे ७० लाख रुपये थकीत आहे. ५६ लाख रुपये पाणी पुरवठा योजनेचे थकीत झाले आहे. ३८ लाख रुपये वीज बिलाचे थकीत झाले आहे. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतचा गाडा हाकताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. ही परिस्थिती बदलविणे काळाची गरज आहे. यामुळे रायपूर गावाचा विकास रखडला असल्याचे आंबटकर यांनी सांगितले.