चंद्रपूर :  लोकसभेसाठी पहिल्याच टप्प्यात मतदान असल्याने भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. तर कॉग्रेस पक्षात उमेदवारीवरून गोंधळ सुरू आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार मुलगी शिवानी वडेट्टीवार हिच्या उमेदवारीसाठी शिष्टमंडळासह दिल्लीत आहे. आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुंबईत कॉग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेवून पक्षाकडे भावनिक आवाहन केले आहे. दरम्यान, तेली समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याने शेवटच्या क्षणी जिल्हा कॉग्रेसचे माजी अध्यक्ष विनायक बांगडे यांच्याही नावाची एंन्ट्री झाली आहे.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात १९ एप्रिल रोजी मतदान आहे. त्या दृष्टीने भाजपाने प्रचार, जाहीर सभा तथा घरोघरी प्रत्यक्ष पोहचण्याचे नियोजन केले आहे. लोकसभा निवडणुक जाहीर होताच १६ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता या लोकसभा क्षेत्रातील बहुसंख्य मतदारांचा मोबाईल खणखणला. यावेळी समोरून मी सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार बोलतोय, यावेळी मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आशिर्वाद द्या असे आवाहन मतदारांना केले. मुनगंटीवार नियोजनबध्द पध्दतीने निवडणुकीला सामोरे जात असतांना कॉग्रेस पक्षात उमेदवारीचा गोंधळ सुरू आहे. वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप प्रसंगी मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या माध्यमातून कॉग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, प्रियंका गांधी, कॉग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेवून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांची पत्नी या नात्याने नैसर्गीक न्यायाप्रमाणे लोकसभेच्या उमेदवारीसाठी भावनिक साद घातली.

Leaders of Mahavikas Aghadi ignore Yavatmal-Washim
महाविकास आघाडीच्या नेत्यांची यवतमाळ-वाशिमकडे पाठ?
Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी
Hemant Godse still hopeful for Nashik seat It is claimed that Chief Minister is also insistent
नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे अजूनही आशावादी, मुख्यमंत्रीही आग्रही असल्याचा दावा

हेही वाचा >>>  ‘देवराई’च्या देवदूताचा आता वन्यजीवांसाठीही पुढाकार

निर्भय बनो सभा आयोजकांनीही धानोरकर यांचेच नाव समोर केले आहे. तर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे न्याय यात्रेच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी होती. ही जबाबदारी पार पाडतांनाच वडेट्टीवार यांनी प्रदेश युवक कॉग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार या स्वत:च्या मुलीचे नाव पून्हा एकदा समोर केले. प्रदेश कॉग्रेसने दिल्लीला पाठविलेल्या यादीत शिवानीचे नाव नाही. मात्र त्यानंतरही वडेट्टीवार यांनी मुलीच्या नावाचा आग्रह धरलेला आहे. विशेष म्हणजे शिवानी समर्थनार्थ वडेट्टीवार गटाचे शिष्टमंडळ सलग दुसऱ्यांदा रात्री उशिरा दिल्लीत दाखल झालेला आहे. वडेट्टीवारांचे शिष्टमंडळ कॉग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी घेवून शिवानी वडेट्टीवारांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरणार आहे. कॉग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांचेही नाव उमेदवारांच्या यादीत आहे. मात्र धोटे यांची लोकसभा लढण्याची इच्छा नसल्याने उमेदवारीसाठी ते आग्रही नाहीत. तसेच धोटे यांनी कॉग्रेस श्रेष्ठींना चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील स्थानिक व कुणबी समाजाचा उमेदवार द्यावा अशी मागणी करून वडेट्टीवार पिता पुत्रीच्या नावाचा थेट विरोध केला आहे. तर शिवानीला उमेदवारी हा निर्णय तिची व कॉग्रेस पक्षाची राजकीय आत्महत्या असेल अशीही चर्चा या लोकसभ मतदार संघात आहे.

हेही वाचा >>> “एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांपेक्षा मी रवी राणांना घाबरतो”… बच्‍चू कडूंनी उडवली खिल्‍ली

कुणबी समाजा पाठोपाठ तेली समाज आक्रमक झाला आहे. तेल समाजाने बैठकांचे सत्र सुरू करून कॉग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे व प्रकाश देवतळे ही दोन नावे समोर केली आहे. विशेष म्हणजे विनायक बांगडे यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉग्रेसने उमेदवारी दिली होती. मात्र ऐनवेळी भाकरी फिरवीत शिवसेनेतून शेवटच्या क्षणी कॉग्रेस पक्षात आलेल्या बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली. धानोरकर यांनी विजय संपादन केला. मात्र धानोरकरांंच्या अकाली मृत्युमुळे कॉग्रेसला उमेदवार शोधावा लागतो आहे. बांगडे यांनी २०१९ मध्ये शेवटच्या क्षणी कापलेली उमेदवारी २०२४ मध्ये मला द्यावी, अन्यथा तेली समाज वेगळी भूमिका घेईल, असा इशारा दिल्याने कॉग्रेस पक्षासमोर कुणबी की तेली असा पेच निर्माण झाला आहे.