अमरावती : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविषयी काढलेल्या अपमानजनक व आक्षेपार्ह उद्गारांनी समस्त महिलांचा अपमान झाला. हेच महाविकास आघाडीचे महिला विषयक धोरण आहे का, असा सवाल भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला आहे.

शिवराय कुळकर्णी यांनी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्‍यावर टीका केली. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचार सभेत बोलत असताना संजय राऊत यांनी नवनीत राणा यांचा उल्लेख ‘नाची’ असा केला. बबली, डान्सर असाही आक्षेपार्ह उल्लेख केला. तुम्हाला ती बाई खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे, तुम्हाला प्रेमाने बोलावेल, पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका. पुराणामध्ये विश्वामित्राचे सुध्दा हरण झाले, ऋषीमुनी सुध्दा गेले, पण आपण सगळ्यांनी सावध राहीले पाहिजे, असे अनेक आक्षेपार्ह शब्द संजय राऊत यांनी वापरले.

jp nadda slams Kangana Ranaut marathi news
जे.पी. नड्डा यांच्याकडून कंगना यांची कानउघाडणी
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
kangana Ranaut and simranjit singh mann
Kangana Ranaut : “कंगना रणौत यांना बलात्काराचा खूप अनुभव”, माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
Congress is involve in dispute between two factions of BJP Nagpur news
भाजपच्या दोन गटातील वादात काँग्रेसची उडी, काय आहे प्रकार
Nagpur university professor sonu jeswani
भाजपमधील मोठ्या नेत्यांच्या नावाचा वापर करून डॉ. कल्पना पांडे यांची मनमानी, ‘यांनी’ केला आरोप
Amit Gorkhe, Parth Pawar ,
पिंपरी-चिंचवड: पार्थ पवारांनी महायुतीविरोधात वक्तव्ये करणं टाळावं – भाजपा आमदार अमित गोरखे
Ladki Bahin Yojana Aditi Tatkare
“…तर १५०० परत घेऊ”, रवी राणांच्या विधानावर आदिती तटकरेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “महायुतीच्या सरकारने…”
Maharashtra Navnirman Sena workers attacked Uddhav Thackeray convoy in Thane
ठाण्यात उद्धव यांच्यावरील मनसे हल्ल्याला कोणाचे छुपे समर्थन?

हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी बेंबीच्या देठापासून…” प्रकाश आंबेडकर यांची टीका; म्हणाले, “त्यांनी आधी संविधानाबद्दलची…”

महाविकास आघाडीचे नेते प्रत्येक भाषणात फुले, शाहू, आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांची नावे घेतात. महिलांचा असा अपमान करणाऱ्यांना ही नावे घेण्याचा अधिकार आहे का? नाची या शब्दाचा भावार्थ फार वाईट आहे. नवनीत राणा या कोणाची तरी आई, कोणाची बहीण, कोणाची मुलगी तर कोणाची सून आहे. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य जसे चूप बसले होते, तसेच काल संजय राऊत एका महिलेविषयी गलिच्छ शब्दात बोलत असताना यशोमती ठाकूर, सुनील देशमुख, हर्षवर्धन देशमुख, बबलू देशमुख, अनंत गुढे मूग गिळून बसले होते. हीच यांची राजकीय संस्कृती आहे का, याचेही उत्तरही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा…कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा महायुतीला फटका, किशोर तिवारींचा दावा,’ ३० जागांवर…’

आपल्या भाषणांमधून जिल्ह्याच्या राजकीय संस्कृतीच्या गप्पा मारणारे काँग्रेसचे नेते महिलांच्या अपमानावर माना डोलवत होते, हे दुर्दैवी असल्याचे शिवराय कुळकर्णी म्हणाले. संजय राऊत यांच्यावर भादंविच्या ३५४ कलमान्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आमची मागणी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या पत्रकार परिषदेला जयंत डेहणकर, प्रा. दिनेध सूर्यवंशी, किरणताई महल्ले, लता देशमुख, अनिता तिखिले, गंगाताई खारकर उपस्थित होते.