प्रशांत देशमुख
वर्धा : कारंजा तालुक्यातील सुसूनद्रा गावालगत जंगलातील दुर्गम भागात दोन वर्षीय बिबट्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था फार वाईट असल्यामुळे बिबट नर आहे की मादी, हे ओळखणेसुद्धा कठीण होते.

पंधरा ते वीस दिवसांपूर्वी बिबट्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वैद्यकीय अधिका-यांनी व्यक्त केली आहे. बिबट्याचे सर्व अवयव सडलेल्या अवस्थेत व मागचा भाग रानटी कुत्र्यांनी तोडल्याचा निष्कर्ष आहे. व्हिसेरा अहवाल आल्यानंतरच बिबट नर आहे की मादी, हे कळेल, असे जिल्हा वन अधिकारी सेपट यांनी सांगितले. मानद वन्य जीव संरक्षक कौशल मिश्रा म्हणाले, ही दुर्मिळ अशी घटना म्हणावी लागेल.

Stormy rains damage mango orchards in Trimbakeshwar taluka
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वादळी पावसामुळे आंबा बागांचे नुकसान
heart attack in the swimming pool
धक्कादायक! ‘स्विमिंग पूल’मध्येच हृदयविकाराचा झटका
water shortage Nashik district
नाशिक : पाणी टंचाईचे नाशिक जिल्ह्यात दोन बळी, मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी

वन अधिकारी किंवा चौकीदार गस्त घालत असतात, पण त्यांनाही ही बाब आढळून आली नाही. मृत बिबट कसलीच हालचाल नसलेल्या भागात आढळून आला आहे. ठरलेल्या मानकानुसार मृतदेह जाळण्यात आल्याचेही त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. बिबट्याच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याची शिकार झाल्याची शक्यता मात्र फेटाळण्यात आली आहे.