बुलढाणा : सासुरवाडीत जाऊन पत्नी व चिमुकल्या मुलीची निर्घृण हत्या करणाऱ्या मलकापूर (जि. बुलढाणा) तालुक्यातील मारेकऱ्याने आत्महत्या केली. जळगाव व बुलढाणा जिल्ह्याला हादरविणारा हा भीषण घटनाक्रम आज शुक्रवारी घडला. या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील फत्तेपुर व बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.

मलकापूर तालुक्यातील दुधलगांव बुद्रुक येथील रहिवासी विशाल मधूकर झनके (३०) याचा काही वर्षांपूर्वी जळगाव खान्देशातील देऊळगाव गुजरी येथील प्रतिभा नावाच्या मुलीशी झाला होता. त्यांना प्रिया (२ वर्षे) व दिव्या (१० महिने) या दोन मुली होत्या. कौटुंबिक कलहातून प्रतिभा झनके गत दोन महिन्यांपासून माहेरी देऊळगाव गुजरी येथे राहत होती. दरम्यान, आज शुक्रवारी सकाळी विशाल झनके दुचाकीने सासूरवाडीला गेला. तिथे पत्नीचे आईवडिल घरी नसताना त्याने पत्नी प्रतिभा व चिमुकली दिव्या यांची गळा चिरून हत्या केली. घटनास्थळावरून तो आज उशिरा राहत्या गावी परतला. त्याने जांबुळधाबा शिवारात स्वतःच्या शेतातील विहिरीत पायाला दगड बांधून उडी घेत आत्महत्या केली. हत्येप्रकरणी खान्देशातील फत्तेपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकापूर ग्रामीण पोलिसांनी आत्महत्या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brutal killing of daughter along with wife in buldhana scm 61 amy
First published on: 13-04-2024 at 03:42 IST