कॉपीमुक्त अभियानाची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या सिंदखेडराजा तालुक्यातील पेपरफूट प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी पाच व्यक्तींना अटक केली आहे. यामध्ये खाजगी संस्थेवरील दोन शिक्षकांसह तीन व्यक्तींचा समावेश आहे. या पाच जणांचा पेपर फुटीमधील सहभाग सिद्ध झाला असला तरी मुख्य सूत्रधाराचा थांगपत्ता अजून लागला नाही.

हेही वाचा >>>अकोला: २६ वर्षांत २११७ हृदयरुग्णांना नवसंजीवनी; ‘लॉयन्स मिडटाऊन’चा पुढाकार

offensive song during marriage marathi news
लग्नाच्या वरातीत आक्षेपार्ह गाणे; दोन गट भिडले, तिघे जखमी, चार ताब्यात
vinay kore marathi news, dhairaysheel mane marathi news
वारणा समूहाची विश्वासार्हता दाखवून देताना धैर्यशील मानेंना विजयी करा; जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे
Rameshwaram Cafe Bomb Blast Case
रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाच्या सूत्रधारासह एकाला अटक; एनआयएची मोठी कारवाई
Narayan Rane case, Vinayak Raut, Parab,
२००५ नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचे प्रकरण : विनायक राऊत, परब, सावंत, देसाई, रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका

इयत्ता १२ वीचा गणित विषयाचा पेपर समाज माध्यमातून फुटल्या प्रकरणी प्रारंभी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर तो साखरखेर्डा पोलिसांकडे ४ मार्चला वर्ग करण्यात आला. मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार व ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवली. पेपरफुटीसाठी कारणीभूत असलेल्या संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यातील पाच व्यक्तींचा सहभाग निश्चित झाल्यावर त्यांना अटक करण्यात आली. पाचही आरोपींची वैद्यकीय तपासणी केल्यावर पोलिसांनी त्यांना रात्री उशिरा अटक केली आहे. आरोपींमध्ये गजानन शेषराव आढे (३४), रा. किनगाव जट्टू, ता. लोणार, गोपाल दामोधर शिंगणे (३०), रा. शेंदूरजन, ता सिंदखेड राजा व भंडारी येथील गणेश शिवानंद नागरे (३०), पवन सुधाकर नागरे (२३) व गणेश बद्रीनाथ पालवे यांचा समावेश आहे. त्यामुळे या फुटीचे धागेदोरे सिंदखेडराजा तालुक्यातील काही गावासह लोणार तालुक्यापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा >>>नागपूर: ताडोबाचा अनभिषिक्त सम्राट ‘मटकासुर’च्या मृत्यूची वार्ता, अन…

ह्या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यात येत असल्याचे ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी सांगितले. मुख्य सूत्रधाराचा शोध लागला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या पाच आरोपींना आज रविवारी सिंदखेडराजा न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. साखरखेर्डा पोलीस आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी करणार असल्याचे समजते.

पाच आरोपींना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी
सिंदखेडराजा तालुक्यातील पेपरफूट प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी पाच व्यक्तींना अटक करण्यात आली होती. या पाच जणांना आज देऊळगाव राजा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायाधीशांनी त्यांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.