बुलढाणा: “गांधी लढे थे गोरोसे, हम लढेंगे चोरोसे”, काँग्रेसच्या घोषणांनी जयस्तंभ चौक परिसर दणाणला; दुसऱ्या दिवशीही आंदोलन

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वरील अपात्रता कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते आज दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर उतरले.

Congress protest against BJP in Pimpri Chinchwad
"गांधी लढे थे गोरोसे, हम लढेंगे चोरोसे", काँग्रेसच्या घोषणांनी जयस्तंभ चौक परिसर दणाणला; दुसऱ्या दिवशीही आंदोलन

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वरील अपात्रता कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते आज दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर उतरले. सर्व गटतट विसरून एकत्र आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग आणि त्यांच्या हातातील मार्मिक फलक हे आजच्या आंदोलनाचे वैशिष्ट्य ठरले.आज शनिवारी दुपारी दीड वाजता पक्षातर्फे स्थानिय जयस्तंभ चौकात तीव्र निदर्शने करून आक्रमक घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी देण्यात आलेल्या, ‘या मोदी सरकारचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, गांधी लढे थे गोरोसे हम लढेंगे चोरोसे, मोदी सरकार हाय हाय, या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणला.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हेही वाचा >>>वर्धा: देशभरातील अडीच हजारावर रेल्वे थांबे बंद; रेल्वेमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले…

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात सतीश महेंद्रे , सुनील सपकाळ, तुळशीराम नाईक, दीपक रिंढे, मोईन काझी, दत्ता काकस, सुनील तायडे, विनोद बेंडवाल, चित्रांगण खंडारे, रवि पाटील, एकनाथ चव्हाण , शैलेश खेडकर, प्रमोद जाधव, बंडू काळवाघे, प्रवीण सुरडकर, ऋषभ साळवे, प्रमोद जाधव , गौतम मोरे, श्रीकांत आराख, सय्यद अन्सार, नितीन राठोड ,वैभव पवार, प्रतीक सरकटे, ज्ञानेश्वर पाटील, रोहित राजे, जाकीर कुरेशी, पुरुषोत्तम देवकर, गजनफर खान, सुनील पनपालिया, अल्ताफ खान, रियाज ठेकेदार, अभय सोनुने आदी पदाधिकारी सहभागी झाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 16:18 IST
Next Story
वर्धा : रानडुकरांच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
Exit mobile version