यवतमाळ : ‘इव्हीएम’ऐवजी ‘बॅलेट पेपर’वर मतदान प्रक्रिया घेतल्यास निवडणूक ड्युटी करतो, असे पत्र प्रशासनास देणाऱ्या येथील अमोलकचंद महाविद्यालयातील प्राध्यापकाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ येथील उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून अवधुतवाडी पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. प्रा. डॉ. सागर जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा >>> ‘ईव्हीएम’ऐवजी ‘बॅलेट पेपर’वर मतदान घेतल्यास निवडणूक ड्युटी करतो! प्राध्यापकाच्या व्हायरल पत्राची समाजमाध्यमांमध्ये चर्चा 

Sharad Pawar
कच्चथिवू बेटावरून शरद पवारांचा मोदींवर पलटवार, म्हणाले, “हयात नसलेल्या इंदिरा गांधींवर…”
CJI DY Chandrachud
केंद्रीय तपास यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित…”
rahul gandhi sanjay nirupam
“काँग्रेसने त्यांची उरलीसुरली ऊर्जा…”, संजय निरुपमांचा घरचा आहेर; म्हणाले, “माझ्यावर स्टेशनरी खर्च करू नका, मी उद्या…”
pm narendra modi interview marathi (1)
Video: तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत नरेंद्र मोदींना थेट प्रश्न; उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले…

 प्रा. सागर जाधव यांनी आपण ‘इव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेद्वारा निवडणूक प्रक्रिया घेतल्यास मतदान केंद्राध्यक्ष म्हणून सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यास तयार आहोत, असे पत्रच थेट जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले. हे पत्र समाज माध्यमांत सार्वत्रिक झाले. प्रा. जाधव यांनी हे पत्र समाज माध्यम तसेच बातमी प्रसिद्ध प्रसिद्ध करून निवडणूक कर्तव्यात असलेले अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिकामध्ये ‘इव्हीएम’संदर्भांत संभ्रम निर्माण केला व निवडणुकीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे दिसून येते, अशी तक्रार अवधुतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली. याबाबतची बातमी प्रसिध्द केली ही बाब अत्यंत बेजबाबदार व गैरकायदेशीर स्वरूपाची आहे. तसेच त्यांनी केलेले विधान आक्षेपार्ह व अशोभनीय असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ‘इव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घेतल्यास जबाबदारी पार पाडू, असे गैरकायदेशीर व बेजबाबदार स्वरूपाचे मत व्यक्त केले, असे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरून प्रा. डॉ. सागर जाधव यांच्याविरोधात लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे भादंवि कलम १३४ सहकलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.