चंद्रपूर : महायुतीचे उमेदवार तथा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची समाज माध्यमावर बदनामी केल्याप्रकरणी माजी नगरसेवक बलराम डोडानी व अन्य एका महिलेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा व पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली.

नियोजन भवन येथे आयोजित पत्रकारपरिषदेत जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा यांनी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या एकूण १५ उमेदवारांना चिन्ह वितरीत करण्यात आल्याची माहिती दिली. यामध्ये राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना यापूर्वीच चिन्ह मिळाले असून शनिवारी राज्यस्तरीय तथा अपक्ष उमेदवारांना चिन्ह वितरीत केले आहे. ४८ पैकी ३३ नामनिर्देशन पत्र रद्द झाल्यासंदर्भात विचारले असता अनेकांनी परिपूर्ण माहिती भरली नाही. त्यामुळे अर्ज रद्द केल्याचे सांगितले.

Pratibha Dhanorkar
चंद्रपूर : बंदव्दार चर्चेत काय ठरले? आमदार प्रतिभा धानोरकरांनी घेतली नाराज विजय वडेट्टीवारांची भेट
Chandrapur Congress Candidate pratibha dhanorkar Faces Backlash for Accept Lakshmi and Vote Remark
निवडणुकीत ‘लक्ष्मी’ स्वीकारा आणि मतदान करा, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचे वादग्रस्त वक्तव्य
in chandrapur narendra modi going to take first campaign meeting of maharashtra for lok sabha 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा चंद्रपुरात; सुधीर मुनगंटीवार यांना आशीर्वाद देण्यासाठी पंतप्रधान…
Attempted suicide by hanging on mobile tower man injured
‘तो’ मोबाईल टॉवरवर चढला, गळफास लावला अन् उडी घेतली; पुढे जे घडले ते…

हेही वाचा““आत राहायचे की बाहेर पडायचे हे बच्चू कडूंनीच ठरवावे,” भाजपानेते संजय कुटे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “नवनीत राणाच…”

समाज माध्यमावर निवडणूक विभागाचे विशेष लक्ष आहे. महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची समाज माध्यमावर बदनामी केल्याप्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात दोन तक्रारी प्राप्त झाल्या. याप्रकरणी माजी नगरसेवक बलराम डोडानी व श्रीमती सोयाम या महिलेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाज माध्यमावर कोणत्याही पक्षाच्या अथवा अपक्ष उमेदवाराची कुठल्याही प्रकारे बदनामीकारक मजकूर टाकू नये. अन्यथा कारवाई करण्याचा इशारादेखील यावेळी देण्यात आला.

हेही वाचा…वाशीम : सर्वेक्षण पथकाच्या तपासणीत ३६ लाखाची रोकड जप्त; २० लाख संशयास्पद, आयकर विभागाकडून चौकशी

आदर्श आचार संहिता भंगप्रकरणी आठ गुन्हे दाखल केले असल्याचेही निवडणूक अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले. निवडणूक काळात २४ लाख रोकड तथा दारू, सुगंधीत तंबाखू, असा १ कोटी २० लाखाचा ऐवज जप्त केल्याची माहिती त्यांनी दिली. अपंग व ८५ वर्षांवरील मतदारांना विशेष व्यवस्था केली असल्याचेही सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यात ५४२ बंदूक परवाने आहेत. यापैकी फक्त चार जणांना जीवाला धोका असल्याच्या सबळ पुरावाअंती बंदूक स्वतःजवळ बाळगण्याची परवानगी दिली आहे. अन्य सर्व परवानाधारक यांच्याकडून बंदुका जमा करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.