चंद्रपूर: चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या जल व वायू प्रदुषणामुळे मानव व प्राण्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम हाेऊन धोका निर्माण होत असल्यामुळे याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात २५ ऑक्टोबरला सुनावणी घेण्यात आली. मात्र, या सुनावणीला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव उपस्थित नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सुनावणीला परवानगीविना अनुपस्थित राहिल्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.

२४ तासाच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याच्या सूचना दिल्या असून स्पष्टीकरण न दिल्यास समोरील कारवाई करण्यात येईल असा इशारा सुध्दा कारणे नोटीसीव्दारे देण्यात आला आहे. यादव यांनी स्पष्टीकरण सादर केल्याची माहिती असून याबाबत त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. विशेष म्हणजे यादव मुंबईत बसून कार्यालयाचे काम करीत आहेत. कार्यालयात सातत्याने अनुपस्थित राहतात. जिल्हाधिकारी यांनी बोलविलेल्या बैठकांना अनुपस्थित असतात. त्यामुळेच जिल्हाधिकारी यांनी ही नोटीस बजावली आहे.

police constable suspended for helping drug smuggler
अंमली पदार्थ तस्कराला मदत केल्याप्रकरणी पोलीस शिपायावर निलंबनाची कारवाई
Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
mumbai municipal corporation, transparent administration
मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शी होणार? नागरिकांशी संवाद, संपर्क वाढविण्याचे मनपा आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आवाहन
pune election duty marathi news, pune election training marathi news
पुणे : निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर; पाच हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती

हेही वाचा… दत्तोपंत ठेंगडी यांच्या गावावर शिंदे – फडणवीस यांची कृपादृष्टी, विकासासाठी १५७ कोटी रुपये मंजूर

कार्यालयात सातत्याने अनुपस्थित राहतात. जिल्हाधिकारी यांनी बोलविलेल्या बैठकांना अनुपस्थित असतात. त्यामुळेच जिल्हाधिकारी यांनी ही नोटीस बजावली आहे.